पाळण्यात झोपणारी युवती दिवसभर खेळण्यांद्वारे खेळत राहते
प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या गोष्टीस रस असतो. काही लोक स्वत:च्या छंदाला कमाईचे साधन करतात तर काही लोकांचा छंद कळल्यावर लोक गोंधळून जातात. काहीसा असाच छंद एका युवतीने बाळगला आहे. ही युवती लहान मुलांप्रमाणे राहणे पसंत करते. तिच्या खाण्यापिण्यापासून झोपण्यापर्यंतच्या सर्व सवयी लहान मुलांप्रमाणे आहेत.
पॅगी नावाची ही युवती अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर राहणारी आहे. तिचे राहणीमान अद्याप लहान मुलांप्रमाणे आहे. ज्याप्राकेर मुले खातात-पितात, झोपतात तसेच ही युवती करत असते. तिच्या झोपण्यासाठी कुठलाही बेड नसून ती लहान मुलांप्रमाणे पाळण्यात झोपते. तसेच पूर्ण दिवस खेळण्यांमध्ये रमून गेलेली असते. ती स्वत:च्या या अजब लाइफस्टाइलचा व्हिडिओ तयार करत सोशल मीडियावर अपलोड करते.
पॅगी मिलर नावाची ही युवती स्वत:ला एडल्ट बेबी मानते. तिने स्वत:च्या या बाळांच्या लाइफस्टाइलला 2018 मध्ये स्वीकारले होते आणि 2020 मध्ये तिने या लाइफस्टाइलला नॉर्मलाइज करण्याची इच्छा असल्याचे म्हटले होते. ही युवती केवळ डायपरसाठीच महिन्याकाठी 230 पाउंड म्हणजेच 24 हजार रुपये खर्च करते. याकरता तिला तिच्या पेड सब्सक्रायर्ब्सकडुन पैसा मिळतो. हे सब्सक्रायबर्स तिचे हे आयुष्य पाहणे पसंत करतात. ती स्वत:साठी खेळणी जमविते आणि त्यांच्यासोबत खेळत असते. एवढेच नाही तर बेबी फीडरद्वारेच ती खात असते.
मिलरने स्वत:चे युट्यूब चॅनेल सुरू केले असून वेबसाइटही तयार केले आहे. एडल्ट बेबी स्वत:चे आयुष्य लोकांसोबत शेअर करते. परंतु प्रत्येकाला हा प्रकार आवडतोच असे नाही. पॅगी मिलरला काही जण मानसिक रुग्ण ठरवत असतात. परंतु ती अशाप्रकारच्या नकारात्मक टिप्पणींकडे लक्ष देत नाही. तिचा मित्रपरिवार आणि कुटुंबीयांनी तिची ही लाइफस्टाइल स्वीकारली आहे.