फुलासारखा आकार घेणार किडा
रंग बदलण्यात तरबेज
जगात अनेक किडे शिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी वेगळ्या प्रकारचा आकार धारण करतात. ऑर्किड मेंटिस अशाच सर्वात आकर्षक किटकांपैकी एक आहे. ऑर्किड फुलांशी स्वत:च्या अद्भूत समानतेमुळे ओळखला जाणारा हा मेंटिस स्वत:च्या अनोख्या रुपाचा वापर स्वत:च्या आसपासच्या वातावरणात सहजपणे मिसळून जाण्यासाठी करतो.
ऑर्किड मेंटिस केवळ सुंदर नसतात तर ते कुशल शिकारीही असतात. स्वत:च्या फुलासारख्या वेशाचा वापर शिकारीला घात लावण्यासाठी करतात. दक्षिणपूर्व आशियाच्या वर्षावनांमध्ये हा किटक आढळून येतो. तेथे त्यांचा चमकणारा रंग आणि पंखांसारख्या अंगेममुळे त्यांचे वनस्पतींदरम्यान दिसणे जवळपास अशक्यप्राय ठरते.
ऑर्किड मेंटिस हा एक आकर्षक किटक असून तो स्वत:चा वेश बदलण्यासाठी अद्भूत क्षमता म्हणजेच छलावरणासाठी ओळखला जाते. ही मेंटिस प्रजाती ऑर्किड फुलांप्रमाणे दिसण्याची नक्कल करण्यासाठी विकसित झाली आहे. ज्यामुळे ही वेश बदलण्यास तरबेज ठरली आहे. अनेक अन्य मेंटिस प्रजातींच्या उलट ऑर्किड मेंटिस हिरव्या किंवा करड्या रंगाच्या छलावरणात निर्भर नसतात. याऐवजी हे ऑर्किड फुलांचे जिवंत रंग आणि आकृतींची नक्कल करतात.
हा मेंटिस स्वत:च्या शिकारीवर घात लावण्यासाठी फुलासारख्या दिसणाऱ्या आकारात स्वत:ला बदलतो. फुलांकडे आकर्षित होणारे किटक अनेकदा याचे शिकार ठरतात. हा स्वत:च्या आसपासच्या वातवरणात मिसळून जाण्यासाठी स्वत:चा रंग बदलू शकतो. पांढऱ्यापासुन गुलाबी तसेच जांभळा रंगही धारण करू शकतो. यामुळे समोरच्याला चकविण्याची क्षमता अधिकच वाढते.
केवळ आकार आणि रंगच नव्हे तर ऑर्किड मेंटिसच्या चालण्याची एक अनोखी पद्धत आहे. हवेत फुलांच्या हलण्याची नक्कल हा किटक करतो, यामुळे शिकारींसाठी तो ओळखणे अधिकच अवघड ठरते. या मेंटिसची नजर अत्यंत चांगली असते, यामुळे तो विद्युतवेगाने शिकारीचा शोध लावू शकतो आणि त्यावर हल्ला करू शकतो.
ऑर्किड मेंटिसचे पाय विशेष असतात, जे फुलांच्या पाकळ्यांशी मिळतेजुळते असतात. ते दीर्घकाळापर्यंत न हलता राहू शकतात. शिकारी टप्प्यात येण्याचा हा किटक प्रतीक्षा करतो. स्वत:च्या पुढील पाय आणि पंखांना फैलावून शिकारींसाठी तो अधिक भयभीत करणारे रुप धारण करतो. स्वत:च्या शक्तिशाली पुढील पायांचा वापर शिकार पकडण्यासाठी करतो.
या प्रजातीत स्पर्शाची अत्याधिक विकसित भावना असते, जी त्यांना संभाव्य शिकारीचे कंपन आणि हालचालींचा शोध घेण्यास मदत करते. हा मेंटिस स्वत:च्या प्रजातीचे जीवही खात असतो. मादी कधीकधी नरालाच फस्त करून टाकते. ऑर्किट मेंटिस पेट बिझनेसमध्ये लोकप्रिय आहे. लोक त्यांना स्वत:च्या उद्यानात पाळीव करून ठेवतात. यामुळे किटकांची संख्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.