पायांशिवाय जन्मलेल्या महिलेकडून विश्वविक्रम
अभिनेत्री, मॉडेल अशीही ओळख
दिव्यांग असूनही अनोखी कामगिरी करणाऱ्या लोकांच्या कहाण्या रोमांचित करत असतात. अशीच एक कहाणी अमेरिकेतील 31 वर्षीय महिलेची आहे. ही महिला पाय आणि बोटांशिवाय जन्माला आली होती, परंतु तिने कधीच स्वत:च्या दिव्यांगत्वामुळे निराश न होता एक असे उदाहरण जगासमोर सादर केले आहे, जे पाहून सर्वजण थक्क होत आहेत. ही महिला आता अॅथलीट, मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तसेच तिचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.
कान्या सेसरने अनेक अडथळे ओलांडत हे यश मिळविले आहे. अमेरेकच्या ओरेगनच्या पोर्टलँड येथील 31 वर्षीय दृढनिश्चयी महिलेसाठी कामगिरींची एक अशी यादी आहे, जी लाखो लोकांना मागे टाकणारी आहे. आता तिने स्केटिंगच्या क्षेत्रात विश्वविक्रम केला आहे. कान्याने स्केटबोर्डवर सर्वात लांब हँडस्टँड (एलए3) पूर्ण केला, ज्यात तिने 19.65 सेकंदांपर्यंत स्वत:च्या हातांना बोर्डावर ठेवून स्वत:ला सहारा दिला.
1992 मध्ये दोन्ही पायांशिवाय जन्मलेली कान्या हिच्या आयुष्यात प्रारंभी खूप अडचणी उभ्या ठाकल्या. थायलंडच्या पाक चोंगमध्ये एका बौद्ध मंदिर शाळेजवळून जाणाऱ्या महिलेला ती आढळून आली होती. या महिलेने तिला रुग्णालयात नेले होते, जेथून मे 1998 मध्ये एका अमेरिकन कुटुंबाने तिला दत्तक घेतले. यानंतर कान्या पोर्टलंड येथे गेले, जेथे ती आईवडिल जेन आणि डेव तसेच स्वत:च्या दोन मोठ्या भावांसोबत लहानाची मोठी झाली.
भाषेच्या अडथळ्यासोबत कान्यासमोर तिच्या बोटांमुळे समस्या उभी ठाकली. तिच्या बोटांच्या स्थितीमुळे तिला अनेक शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागले. हायस्कूलच्या पहिल्या वर्षापर्यंत ती चीयरलीडिंग स्क्वाडमध्ये सामील झाले. हायस्कूलमध्ये तिला पहिले मॉडेलिंगचे कामही मिळाले. त्यानंतर तिची ओळख स्केटबोर्डिंगशी झाली होती.
कान्या ही 2022 चा चित्रपट बेबीलॉन आणि टीव्ही सीरिज द वॉकिंग डेड आणि हवाई फाइव्ह-0 समवेत म्युझिक व्हिडिओ, चित्रप आणि टीव्ही शोंमध्ये दिसून आली आहे. कान्याची विश्वविक्रमी कामगिरी सप्टेंबरमध्ये जगासमोर मांडली जाणार आहे.