महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रहस्यांनी भरलेले अद्भूत प्राचीन शहर

06:13 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंदिरांसारख्या खडकांसाठी प्रसिद्ध

Advertisement

तुर्कियेतील अदभुत प्राचीन शहर काउनोस रहस्यांनी भरलेले आहे. काउनोस एकेकाळी अनातोलियामध्ये एक बंदर शहर होते, आता हे मुगला प्रांताच्या डालियान जिल्ह्यात असून ते स्वत:च्या मंदिरासारख्या खडकयुक्त कब्रसाठी लोकप्रिय आहे. तसेच शहरात आजही अनेक आश्चर्यकारक अवशेष आहेत.

Advertisement

काउनोस शहराचा समृद्ध इतिहास 3 हजार वर्षांपेक्षा अधिक जुना आहे. हे शर खडकांमध्ये तयार करण्यात आलेल्या थडग्यांमुळे देशातील सर्वात आकर्षक ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. या शहराचा शोध 1842 मध्ये पुरातत्व तज्ञ होस्किन यांनी केला होता.

खडकयुक्त थडग्यांसाठी काउनोस लोकप्रिय आहे. शहरात खडकांमध्ये तयार करण्यात आलेल्या थडग्यांची संख्या 167 असल्याचे सांगण्यात येते, या थडग्यांचा पुढील हिस्सा हेलेनिस्टिक मंदिरांसारखा आहे. काउनोस बंदर शहर स्वत:चे मीठ उत्पादन आणि व्यापारासाठी प्रसिद्ध होते. 2014 मध्ये ऐतिहासिक स्थळाच्या स्वरुपात याचे महत्त्व ओळखत काउनोस प्राचीन शहर आणि रॉक-कट मकबऱ्यांना युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत जोडण्यात आले होते.

काउनोस शहराची भौतिक रचना अत्यंत आश्चर्यजनक आहे. अवशेष दोन चुनादगडांच्या पर्वतांवर असून ते पाहण्याजोगे आहेत. काउनोसचे थिएटर, हेलेनिस्टिक फाउंटेन हाउस, बेसिलिकाचे अवशेष अत्यंत थक्क करणारे आहेत. यातील सर्वात आकर्षक रॉक-कट थडगी आहेत. परंतु या थडग्यांविषयी लेखी नोंदी आढळून येत नाहीत. याचमुळे याच्या आत कुठल्या लोकांना दफन करण्यात आले होते हे स्पष्ट झालेले नाही. तसेच शहरात आणखी अनेक अवशेष जमिनीखाली असल्याने त्यासंबंधीच्या रहस्याची अद्याप उकल झालेली नाही.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#international#social media
Next Article