महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निष्ठा काय असते हे राजन तेलींनी आम्हाला शिकवू नये - अर्चना घारे -परब

05:44 PM Nov 14, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडीत २३ तारीखला नारीशक्तीचा जागर दिसेल : अर्चना घारे - परब

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी : निष्ठा काय असते हे राजन तेलींनी आम्हाला शिकवायची गरज नाही. उलट सध्या व्हायरल होत असलेल्या एका ऑडीओ क्लिपमुळे तेलींना नक्की कोणी उभं केलय याबाबत शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे मीच महाविकास आघाडीची उमेदवार असून विजयांनतरही मी राष्ट्रवादीतच राहणार आहे, असे दावा अपक्ष उमेदवार सौ. अर्चना घारे परब यांनी केला.
सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात अर्चना घारे यांचा 'शपथनामा' प्रकाशित करण्यात आला. यानंतर उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. माझ्या समोरील सर्व उमेदवार हे मूळचे सत्ताधारी पक्षातील असून त्यांच्याकडे धनशक्ती आहे. मात्र, मी या धनशक्ती विरोधात लढा देत असून माझ्यासोबत जनशक्ती आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, हिदायतुल्ला खान, नियाज शेख, बावतीस फर्नांडिस, याकुब शेख, संजय भाईप, आसिफ शेख, विनायक परब, नवल साठेलकर, ऋत्विक परब, विवेक गवस, अवधूत मराठे, साबाजी रेडकर, निलेश गावडे, नोबर्ट माडतीस, पंढरी राऊळ, मारिता फर्नांडिस, पूजा दळवी, गौरी गावडे, नीतीशा नाईक, सुधा सावंत, सुनिता भाई, श्रिया सावंत, अलिषा पेडणेकर, दिपाली मुळीक, सुमित्रा मुळीक, रविकिरण गवस, अमोल दळवी, प्रसाद दळवी, विनायक परब, मयूर कामत, वैभव परब, तनु शेख, समीर मुल्ला, नितीन परब, सदानंद मुळीक चंद्रशेखर परब, प्रसाद परब, आदी उपस्थित होते.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारादरम्यान आम्ही मतदारसंघातील १४८ गावांमध्ये पोहोचलो असून जनतेमधून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'तुम्ही भिया नको आम्ही तुमच्या पाठिशी आसव ' असं सांगत गावागावातील लोक आमचे स्वागत करीत आहेत. सत्ताधाऱ्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड नाराजी असून या निवडणुकीत मतदानच करू नये या मानसिकतेत मतदार आले होते. मात्र, माझ्या उमेदवारीमुळे जनतेला एक सक्षम पर्याय मिळाल्याचे त्यांचे म्हणणे असून विकासाच्या मुद्द्यावर जनता माझ्या पाठीशी उभी राहत आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रविणभाई भोंसले हे आमचे मार्गदर्शक होते.या मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यासाठी आम्ही घेतलेले कष्ट त्यांनी पाहिले होते. त्यामुळे ते आता माझ्यावर नेमकी का टीका करीत आहेत याचं उत्तर तेच देऊ शकतील. तेलींना उमेदवारी मिळवून देण्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले त्यापेक्षा त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले असते तर त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला असता.
आज ते माझ्या उमेदवारी बाबत टीका करीत आहेत मात्र मी पक्षाविरोधात बंडखोरी केली नाही उलट २००९ मध्ये राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार असताना त्यांनी बंडखोरी का केली होती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.राजन तेलींवर बोलण्याची इच्छाच नाही.निष्ठा काय असते हे तेलींना काय माहित असणार. मला जनतेने उभं केलं आहे कोणाची सीट पाडण्यासाठी नाही तर निवडून येण्यासाठी मी लढत आहे. एका महिलेला मिळत असलेला प्रतिसाद, मान सन्मान व महिला आमदार होत असल्याचे पाहून भितीने ते माझ्यावर टीका करीत आहेत . उलट तेलींना कोणी उभं केलं आहे हे अलिकडेच व्हायरल होत असलेल्या ऑडीओ क्लीपमुळे जग जाहिर झालं आहे. त्यामुळे मला पाठींबा वाढत असून माझा विजय निश्चित आहे.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाला विचारांचा वारसा आहे. त्यामुळे विचारांची लढाई आम्ही विचारांनी लढत आहोत. जाणीव जागर यात्रेच्या माध्यमातून आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान उठवले. आमच्यावर संस्कार असल्याने आमची टिका ही संविधानिक भाषेत असते. उगाच पातळी सोडून बोलणं ही आमची संस्कृती नाही. त्यामुळेच सावंतवाडी मतदार संघातील संस्कारी व शांतताप्रेमी जनता आमच्या पाठीशी असून त्यांनी आम्हाला जाहीर पाठिंबा दिला. आम्ही कोणाची ' पाकिटे ' घेणार नाहीत पण तुमच्या विकासाचं मॉडेल असलेल्या पाकिटा ला साथ देणार, असा विश्वास जनतेने आम्हाला दिला आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat # sindhudurg #
Next Article