For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्ग, रत्नागिरीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होणार

12:03 PM Nov 15, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सिंधुदुर्ग  रत्नागिरीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होणार
Advertisement

खा. नारायण राणेंनी व्यक्त केला विश्वास ; महायुतीचे उमेदवार निलेश राणेंच्या प्रचारार्थ मालवणात महायुतीचा मेळावा

Advertisement

मंत्री उदय सामंत, निलेश राणे, दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती

मालवण | प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी गतिमान विकास आणि लोककल्याकारी योजना राबवत देश प्रगतीपथावर नेत आहेत. त्याचं धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुती सरकार राज्यात आदर्शवत असे काम करत आहेत. हे जनतेचे सरकार आहे. आगामी निवडणुकीत जनतेच्या मोठ्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार विजयी होईल. सोबतच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जिल्ह्यातून महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास खासदार नारायण राणे यांनी मालवण येथे बोलताना व्यक्त केला.

Advertisement

दरम्यान, खासदार नारायण राणे यांनी विरोधकांचा समाचार घेतला, विरोधकांचे विकासात योगदान काय? उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात शाळा तरी सुरु केली काय ? मुख्यमंत्री असताना कोरोना काळात औषध खरेदीत कमिशन खाणारे हे लोकं आहेत. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले पवार करू शकले नाहीत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखविले. लाडकी बहीण योजना घराघरात पोहोचली. अनेक योजना यां सरकारने आणल्या. त्यामुळे विरोधकांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करूया. कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला सर्व जागा जिंकून अबाधित ठेऊया असेही आवाहन खा. राणे यांनी केले.

कुडाळ मालवण विधानसभा महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मेळावा मालवण कुंभारमाठ येथील अथर्व सभागृहात पार पडला.यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शिवसेना कुडाळ मालवण निरीक्षक बाळा चिंदरकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, रुपेश पावसकर, महिला उपजिल्हा प्रमुख नीलम शिंदे, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, उपजिल्हा प्रमुख विश्वास गावकर, तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, ऋत्विक सामंत, हर्षद पारकर, बाळू नाटेकर, मधुकर चव्हाण, राजेश हाटले यासह शिवसेना, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी निलेश राणे यांच्या मोठया मताधिक्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

यावेळी खासदार नारायण राणे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला मोफत धान्य दिले, उपचारासाठी पाच लाखापर्यंत खर्च आयुष्यमान योजनेतून होणार आहे, पंतप्रधान आवास योजनेतून बारा कोटी घरे उभारून दिली. अकरा कोटी कुटुंबाना नळपाणी योजनेतून पाणी उपलब्ध करून देण्यात आले. त्याचं धर्तीवर महायुती सरकार अनेक जन हिताच्या योजना राबवत आहे. शेतकरी, कष्टकरी, मच्छिमार, तरुण वर्ग यासह सर्व घटकांसाठी हे सरकार तत्पर आहे. सोबतच विकासाचा आलेख गतिमान राहिला आहे. महायुती सरकार पुन्हा यावे, विकासाची गती कायम रहावे हा जनतेचा निर्धार आहे. त्यामुळे जनतेच्या पाठिंब्यावर हे सरकार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असे खासदार राणे म्हणाले.

जिल्ह्यात 500 कारखाने आणणार!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकरी राहणार नाही यासाठी प्रयत्न सुरु आहेत. स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरु होत आहे. सोबत दोडामार्ग येथे 500 कारखाने सुरु होतील यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हे पूर्णपणे समृद्ध करायचे आहेत. असे खा. नारायण राणे यांनी सांगितले.

यावेळी दत्ता सामंत म्हणले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे तीनही उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी होतील. असे सांगितले. यावेळी संजय आंग्रे, बबन शिंदे, बाळा चिंदरकर, रत्नाकर जोशी यांनी विचार मांडले. निलेश राणे यांच्या मोठया विजयाचा विश्वास व्यक्त केला.

निलेश राणेंचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ : मंत्री उदय सामंत

निलेश राणे हे अतिशय संवेदनशील असे भावनाप्रधान व्यक्तिमत्व आहे. राणे साहेबांप्रमाणे त्यांच्यातही विकासाचे व्हिजन आणि ते करण्याची धमक आहे. सिंधुदुर्ग वासियांचे प्रेम हे नेहमीच राणे कुटुंबाच्या पाठीशी राहिले. या निवडणुकीतही येथील जनता निलेश राणे, नितेश राणे यासह दीपक केसरकर यांना बहुमताने विजयी करेल. आणि राणे कुटुंबासोबत आपण ठाम असल्याचे दाखवून देईल. असे सांगून उदय सामंत पुढे म्हणाले, विरोधकांकडे कोणतेच मुद्दे नाहीत. त्यामुळे राणे कुटुंब चिडले पाहिजे यासाठी खालच्या पातळीवरील टिका, वैयक्तिक टिका विरोधकांकडून केली जात आहे. मात्र या टिकेला उत्तर जनताच मतपेटीतून देईल. असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. कोकणात नारायण राणे यांनी शिवसेना रुजविली. धनुष्यबाण घराघरात पोहिचवीला. याचाही विशेष उल्लेख मंत्री उदय सामंत यांनी केला.

अपप्रचाराला महायुतीचे कार्यकर्ते बळी पडणार नाही : निलेश राणे

येणाऱ्या काही दिवसात विरोधकां कडून अपप्रचार केला जाईल, अफ़वा पसरवल्या जातील, मात्र महायुतीचे कार्यकर्ते आजपर्यंत कोणत्याही अफ़वांना बळी पडले नाही आणि पडणारही नाहीत. 23 तारिखला रत्नागिरी, सिंधुदुर्गातून महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, सर्वत्र विजयी रॅली निघेल असे निलेश राणे यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.