फिल्मी वाटावी अशी महिलेची कहाणी
माकडांसोबत झाली लहानाची मोठी
ही एका अशा महिलेची कहाणी आहे जी ऐकून त्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. एका मुलीला अहपरण करत तिला जंगलात सोडण्यात आले होते, त्यानंतर ती माकडांसोबतच लहानाची मोठी झाली, कोलंबियाच्या जंगलांमध्ये ती फिरायची, यामुळे ती प्राण्यांप्रमाणेच खाणे, झाडांवर चढणे आणि झाडांवर झोपणे शिकली होती. आता 73 वर्षांच्या झालेल्या मरीना चॅपमॅन यांची ही कहाणी आहे.
मरीना यांना जंगलात वावरताना काही जणांनी पाहिले होते. हे लोक गुंड प्रवृत्तीच होते. या लोकांनी मरीनाला पकडून वेश्याव्यवसायात ढकलले होते. परंतु यातून बाहेर पडत ती ब्रिटनमध्ये पोहोचली होती. तेथे एका इसमाने तिच्यासोबत विवाह केला, आता ती दोन मुलांची आई असून स्वत:च्या कुटुंबासमवेत राहत आहे. तिची ही कहाणी अत्यंत फिल्मी आहे.
मरीनाने स्वत:ची कहाणी एक पुस्तक लिहून जगासमोर मांडली आहे. तिच्या पुस्तकाचे नाव ‘द गर्ल विथ नो नेम’ आहे. या पुस्तकाची सहलेखिका त्यांची मुलगी आहे. त्यांच्या याच कहाणीला आता एका टीव्ही शोमध्ये दाखविले जाणार आहे. या टीव्ही शोचे नाव ‘न्यू लिव्स इन द वाइल्ड’ असणार आहे.
मरीनाच्या पावलावर पाऊल ठेवत आता त्यांची मुलगी वेनेसा फोरेरो देखील कोलंबियात जंगलाने वेढलेल्या गावात राहत आहे. 1954 च्या काळात कोलंबियात बालतस्करीचे प्रमाण अधिक होते. यातच मरीनाचे अपहरण करण्यात आले होते. कुणीतरी पांढरा रुमाल चेहऱ्यावर बांधून दोन तिला उचलून नेल होते. यामागील कारण तिला माहित नव्हते, मग अपहरणकर्त्यांनी तिला जंगलात फेकले होते. दोन दिवसांनी माकडांचा एक कळप तिने पाहिला. माकडांचे अनुकरण करत ती जिवंत राहण्याचा प्रयत्न करू लागली. माकडं कुठली फळं खात आहेत अणि कुठले पाणी पित आहे यावर तिने लक्ष ठेवले होते. यानंतर ती माकडांप्रमाणे दोन्ही हात आणि पायांद्वारे चालू लागली. तिने बोलणे बंद केले, मग माकडांनीही तिला आपल्यासारखेच माले.
एकेदिवशी छोटेसे माकड माझ्या खांद्यावर येऊन बसले आणि त्याने स्वत:चे दोन्ही हात माझ्या चेहऱ्यावर ठेवले होते. माकडांदरम्यान मी पाच वर्षांपर्यंत राहिले. मग एकेदिवशी शिकाऱ्यांनी मला पाहिले. या शिकाऱ्यांनी मला वेश्यालयात नेत विकले होते. यानंतर तेथून मी पळाले आणि गल्ल्यांमध्ये फिरत राहिले. मग कुणीतीर घरकाम करण्याची नोकरी दिली. राजधानी बोगोटामध्ये मी काम करत होते, ज्या घरात काम करायचे तेथील लोक ब्रिटनमध्ये स्थायिक होण्यासाठी प्रयत्न करत होते असे मरीना सांगते.
1978 मध्ये सर्व लोक 6 महिन्यांसाठी ब्रॅडफोर्डमध्ये राहिले, येथेच मरीनाची भेट जॉन चॅपमॅनशी झाली. ते एका चर्चमध्ये म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवायचे. दोघेही परस्परांच्या प्रेमात पडले. मग त्यांचा विवाह झाला असून त्यांना दोन मुली आहेत. यात वेनेसा 40 वर्षांची तर जोआना 43 वर्षांची आहे.
मरीना यांच्यासाठी एक गृहिणीप्रमाणे जगणे सोपे नव्हते. त्यांना सर्वकाही शिकून घ्यावे लागले. कसे खावे, कशाप्रकारचे कपडे परिधान करावेत हे देखील शिकावे लागले. परंतु त्या अद्याप शिट्टी वाजविणे आणि झाडांवर सहजपणे चढण्याचे कसब विसरलेल्या नाहीत. लोक त्यांना फीमेल टारजन देखील म्हणतात.