For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समोर दिरभावोजी बसलेत...मी बुरखा उतरवणार नाही...म्हणत महिलेचे राज्यपालांसमोर भाषण

06:17 AM Jan 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
समोर दिरभावोजी बसलेत   मी बुरखा उतरवणार नाही   म्हणत महिलेचे राज्यपालांसमोर भाषण
Advertisement

मध्य प्रदेशातील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात राज्यपाल मंगूभाई पटेल यांच्यासमोर एक मजेदार घटना नुकतीच घडली. येथे एका महिलेला भाषण देण्यासाठी मंचावर बोलावण्यात आले असता तिने बुरखा घालून भाषण केले. ‘येथे समोर माझे  दीरभावजी बसलेले आहेत, त्यामुळे मी पदर काढणार नाही’ असे सांगत तिने आपले भाषण सुरू केले. तिचे हे म्हणणे ऐकताच कार्यक्रमाला उपस्थित लोक हसू लागले. या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला. आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. महिलेच्या या कृतीची लोकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.  बुंदेलखंड भागात महिलांमध्ये चेहऱ्यावर बुरखा घेण्याची प्रथा-परंपरा प्रचलित आहे.

Advertisement

रविवार, 14 जानेवारी रोजी राज्यपाल मंगूभाई पटेल विकास भारत संकल्प यात्रेत सहभागी होण्यासाठी पन्ना जिल्ह्यातील गुणौर विधानसभा मतदारसंघातील चोपडा गावात पोहोचले होते. देश आणि राज्याच्या विकासासह अनेक मुद्यांवर येथे चर्चा होत होती. दरम्यान, सर्वसामान्यांनाही आपले मत मांडण्यासाठी मंचावर बोलावण्यात आले. यादरम्यान तीन लोक मंचावर आपले मत मांडण्यासाठी पोहोचले. यामध्ये सदर महिलेचाही सहभाग होता. तिचे नाव सियाबाई असल्याचे सांगण्यात आले. व्यासपीठावर आल्यावर तिने सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार केला. त्यानंतर तिने भाषणाला सुऊवात केली. या काळात सियाबाईंनी पदर काढला नाही. तिला बुरख्यात भाषण देताना पाहून व्यवस्थापकांनी तिला पदर काढण्यास सांगितले. पण, समोर दीरभावजी बसल्याचे सियाबाईंनी सांगितले.  तिने नकार दर्शवताच सर्वांनी त्या महिलेला बुरखा घालूनच भाषण करण्यास सांगितले. यानंतर सियाबाईंनी आपल्या आयुष्यातील काही कटू गोष्टी शेअर केल्या.

Advertisement

.