शस्त्रक्रियेने बदलले महिलेचे आयुष
फिलाडेल्फियाची 30 वर्षीय डेविन ऐकेन हिने स्वत:च्या जीवनाला उत्तम करण्यासाठी मोठा निर्णय घेतला, नोव्हेंबर महिन्यात तिने 11000 डॉलर्सची राइनोप्लास्टी करवून घेत स्वत:च्या नाकाचा आकार बदलला, मग तिचा आत्मविश्वास देखील नव्या उंचीवर पोहोचला. या शस्त्रक्रियेने तिला स्वत:च्या मोठ्या असुरक्षेला निरोप देण्याची आणि सात वर्षांच्या दु:खी विवाहातून बाहेर पडण्याची हिंमत दिली. डिसेंबरमध्ये घटस्फोटाच्या मागणीसह ऐकेनने आता एक नव्या सुरुवातीच्या दिशेने पावले टाकली आहेत. मी अत्यंत सुंदर असल्याचे वाटू लागले आहे. माझ्या नव्या नाकाने मला स्वत:ला निवडण्याची आणि दयनीय विवाह संपुष्टात आणण्याची शक्ती दिल्याचे तिने म्हटले आहे.
शस्त्रक्रियेनंतर बदल
तिच्या या चकित करणाऱ्या कहाणीने टिकटॉकवर 45 लाख लोकांचे लक्ष वेधले आहे. शस्त्रक्रियेनंतर तिच्या डोळ्यात आलेली चमक आणि घटस्फोटानंतर मिळालेल्या आनंदाने तिला एक नवा दृष्टीकोन दिला. मी सकाळी उठते आणि अत्यंत आनंदाची अनुभूती करते, आता स्वत:च्या उर्वरित जीवनात मी अशाप्रकारे जगू शकते हे मी जाणून असल्याचे ऐकेनने म्हटले आहे. ऐकेनचे जीवन नेहमीच सोपे राहिलेले नाही. शाळेत असताना तिच्या नाकाच्या आकारावरून तिच्या वर्गमित्रांनी तिला चेटकिण, टूकेन आणि पिनोच्चियो यासारखी टोपणनावं ठेवली होती. यामुळे ती नैराश्याने ग्रस्त होती. मुलांच्या खोडकरपणामुळे मला मोठा संघर्ष करावा लागला. माझ्या परिवारात अशाप्रकारचे नाक कुणाचेच नव्हते. यामुळे मला एकाकी वाटायचे असे ती सांगते. याच खालावलेल्या आत्मविश्वासाने तिने वयाच्या 23 व्या वर्षी अशा नात्यात प्रवेश केला, जे तिच्यासाठी नंतर त्रासाचे ठरले. आम्ही घाईत विवाह केल्याची जाणीव झाली, आम्ही परस्परांना नीट ओळखत देखील नव्हतो. माझ्या पतीला माझे नाक पसंत होते, परंतु सातत्याने होणाऱ्या भांडणांमुळे नाते संपुष्टात आल्याचे तिने म्हटले आहे.
शस्त्रक्रियेचा खर्च स्वत: उचलला
मागील वर्षी ऐकेनने फिलाडेल्फियाचे प्लास्टिक सर्जन डॉ. मार्क गिंसबर्ग यांच्याकडून राइनोप्लास्टी करविण्याचा निर्णय घेतला. सुमारे 6 तासांच्या या प्रक्रियेचा खर्च तिनेच उचलला. यामुळे माझे आयुष्य बदले, शस्त्रक्रियेनंतर मिळालेल्या कालावधीत स्वत:च्या विवाहाबद्दल गंभीर विचार करण्याची संधी मिळाली. आता घटस्फोट घेत स्वत:च्या जीवनात पुढे जाण्याची गरज असल्याचे वाटल्याचे ऐकेन सांगते.
घटस्फोटानंतर आनंदाचे शास्त्र
घटस्फोटानंतर नवी ऊर्जा संचारल्याचा अनुभव घेणारी ऐकेन एकमात्र नाही. एका अध्ययनानुसार 82 टक्के लोक स्वत:च्या जोडीदारापासून वेगळे झाल्यावर आत्मविश्वास आणि अंतर्गत शांततेचा अनुभव घेतात. ऐकेनप्रमाणेच अनेक लोक स्वत:मधील आनंदाला स्वीकारतात, तसेच स्वत:च्या बाहेरील रुपाला उजाळा देत असतात.
स्वत:ला निवडण्याची हिंमत
जे करायचे आहे ते करा, हेच तुमचे जीवन आहे, आमच्याकडे जगण्यासाठी केवळ एकच संधी आहे. स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी जे करावे लागेल ते करा, असे ऐकेन सांगते. ऐकेन आता ग्लॅमर आणि स्वयंप्रेमाच्या मार्गावर वाटचाल करत आहे.
नवी सुरुवात, सोशल मीडियावर प्रेम
आता ऐकेन स्वत:चे नवे नाक आणि स्वातंत्र्यासह आयुष्य पूर्ण उत्साहात जगत आहे. मी डेटिंग करत आहे आणि आनंद मिळवत असल्याचे तिने सांगितले. सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सनी तिच्या लुकची तुलना बेला हदीत आणि सेलीन डायोन सारख्या दिग्गजांशी केली. माझी कहाणी इतरांनाही स्वत:साठी योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा देतील, अशी अपेक्षा असल्याचे तिने म्हटले आहे.