कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बाहुलीमुळे बदलले महिलेचे जीवन

06:32 AM Oct 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भीतीपोटी बाहुलीला करावे लागले कैद

Advertisement

ऑनलाइन शॉपिंग आता प्रत्येकाच्या जीवनाचा हिस्सा ठरले आहे. लोक कपड्यांपासून घराची सामग्री देखील इंटरनेटद्वारे मागवत आहेत. परंतु ब्रिटनच्या एका महिलेसोबत घडलेला प्रकार पाहून कुणीही ऑनलाइन काहीही खरेदी करण्यापूर्वी अनेकदा विचार करेल. ब्रिटनच्या कॉर्नवालमध्ये राहणाऱ्या 42 वर्षीय कँडिस कॉलिन्सने इंटरनेटवरुन खरेदी केलेल्या सामग्रीमुळे तिचे जीवनच बदलले आहे आणि ते देखील भयावह पद्धतीने.

Advertisement

कँडिस पेशाने एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर म्हणजेच भूत-प्रेतासारख्या घटनांची चौकशी करते. तिलने अलिकडेच एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून नॉर्मन नावाची बाहुली खरेदी केली. ही काही साधारण बाहुली नसून ब्रिटनमधील सर्वाधिक भूताटकीयुक्त बाहुली आहे. या बाहुलीकरता मी सुमारे 200 पाउंड म्हणजेच जवळपास 21 हजार रुपये खर्च केले होते. बाहुली सोनेरी केसांच अणि निळ्या रंगाच्या रेषा असलेला शर्ट परिधान करून अत्यंत निरागस वाटते परंतु यात काहीतरी गडबड अवश्य असल्याचे कँडिस सांगते. बाहुलीचा जुना मालक क्रिश्चियन हॉक्सवर्थ होता आणि त्याने या बाहुलीला एका अँटीक मेळ्यातून केवळ 3 पाउंडमध्ये खरेदी केले होते. परंतु ही बाहुली घरात येतच हॉक्सवर्थसोबत जे घडले ते एखाद्या हॉरर चित्रपटापेक्षा कमी नव्हते. सर्वप्रथम त्याचा अपेंडिक्स फुटला, मग गोळी लागण्याची घटना घडली. यानंतर कारचे ब्रेक फेल झाले आणि वेतनकपातीसारख्या अजब समस्या सुरू झाल्या. या सर्वामागे या बाहुलीचाच हात असल्याचा विश्वास क्रिश्चियनला झाला. भीतीपोटी त्याने या बाहुलीला ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकून टाकले.

महिलेची बिघडली प्रकृती

नॉर्मनची कहाणी येथेच संपली नाही. काही काळानंतर हीच बाहुली कँडिस कॉलिन्सकडे पोहोचली. या बाहुलीचा डबा उघडताच तिला अजब जाणीव झाली. तसेच त्या दिवसानंतर तिच्या घरात विचित्र घटना घडू लागल्या. तिला वाईट स्वप्नं पडू लागली आणि तिची प्रकृती बिघडलेली राहू लागली. या सर्वानंतर कँडिसने भीतीपोटी या बाहुलीला घरात खुल्या जागेत ठेवले नाही. तिने एका काचेच्या बॉक्समध्ये या बाहुलीला बंद केले आणि त्यावर पवित्र जलाचा शिडकावा केला, जेणेकरून कुठलेही आक्रीत घडू नये. आता ती या बाहुलीला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article