सँटा क्लॉजच्या ऑफिसमध्ये काम करते महिला
लाखो पत्रं पाठवतात लोक
लवकरच नाताळाचा सण साजरा केला जाणार आहे. नोकरदार लोक हिवाळ्यात येणाऱ्या या सणाच्या वेळी सुटीवर जात असतात. परंतु एक महिला स्वत:च्या काही सहकाऱ्यांसोबत या सणाच्या दिवशी आणि त्यानंतरही ऑफिसमध्ये काम करते. त्यादिवशी तिला सुटी मिळू शकत नाही. कारण ही महिला सँटा क्लॉजच्या ऑफिसमध्ये काम करते. फिनलंड देशाच्या उत्तर हिस्स्यात लॅपलँडमध्ये रोवॅनीमी नावाचे शहर आहे. या शहराची लोकसंख्या सुमारे 65 हजार आहे. या शहराला लागून असलेल्या गावात सँटा क्लॉज राहत असल्याचे लोकांचे मानणे आहे. याचमुळे लोक याला सँटा क्लॉजचे अधिकृत शहरही म्हणतात. याचमुळे सँटा क्लॉजचे ऑफिस नावाने एक इमारत देखील आहे.
सँटा क्लॉजच्या गावात असलेल्या त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारे लोक वर्षातील 365 दिवस काम करतात. याचपैकी वनीला ही महिला असून ती रोवॅनीमीची रहिवासी आहे आणि तिला सँटा क्लॉजच्या एल्फची उपाधी मिळाली आहे. एल्फ एक काल्पनिक प्राणी असून ज्याचे लांब कान असतात आणि उंचीत तो अत्यंत छोटा असतो. मान्यतांनुसार सँटा क्लॉचे 6 एल्व्स आहेत. अनेकदा लोक मला खरा एल्फ मानतात असे वनीला सांगते.
पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण
वनीला 2012 पासून सँटा क्लॉज ऑफिसमध्ये काम करत आहे. नाताळाच्या काळात सुमारे 50 एल्व्स ऑफिसमध्ये काम करतात. तर उर्वरित काळात कमी कर्मचारी असतात. जगभरातून जी मुले सँटा क्लॉजला पत्र लिहू इच्छितात, ते याच पत्त्यावर स्वत:चे पत्र पाठवतात. या कार्यालयात एल्फ होण्यासाठी कुठलीच वयोमर्यादा नाही. येथे एक इसम सँटा क्लॉजच्या वेशात असतो. जगभरातून पर्यटक या गावात येत असतात. रेनडियर सफारीचा आनंद घेतात, नॉर्दर्न लाइट पाहतात, सँटा क्लॉज पोस्ट ऑफिसची सुरुवात 1950 मध्ये झाली होती. तर ऑफिस 1980 च्या दशकात तयार करण्यात आले होते.