झोपेतही काम करणारी महिला
स्वप्नांमध्ये सोडविते ऑफिसमधील प्रॉब्लेम
मेटा आणि गुगलच्या माजी कर्मचारी एंड्य्रू येंग यांनी आपण स्वप्नांमध्ये देखील काम करणाऱ्या महिलेला भेटलो असल्याचे सांगितले आहे. या महिलेने स्वप्नांमध्ये येणाऱ्या स्थितींना नियंत्रित करणे शिकले आहे, जेणेकरून झोपेतच स्वत:च्या कामाच्या समस्यांवर तोडगा काढता येईल. ही महिला स्वत:ची फाइब कंपनी चालविते. ही महिला दिवसातील 24 तास काम सांभाळते, ही पद्धत काहीशी विचित्र वाटत असली तरीही तिने स्वत:च्या स्टार्टअपसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उभारला असून तिची एक छोटी परंतु यशस्वी टीम देखील आहे.
ल्यूसिड ड्रीम
सुस्पष्ट स्वप्न अशी स्थिती असते, ज्यात एखादा व्यक्ती स्वप्न पाहताना आपण स्वप्न पाहतोय हे समजून जातो. काही लोक या स्वप्नांना नियंत्रणात ठेवू शकतात किंवा स्वत:च्या इच्छेनुसार बदलू शकतात. अशी स्वप्ने कधी आपोआप पडतात, तर काही लोक त्यांना शिकूनही आणू शकतात, उदाहरणार्थ रियलिटी चेक करणे, स्वप्नांची डायरी लिहिणे किंवा माईल्ड तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे. ल्यूसिड ड्रीमिंगचा साधा सरळ अर्थ स्वप्नांमध्ये आपण स्वप्न पाहतोय, हे जाणणे आहे. जेव्हा तुम्ही ल्युसिड ड्रीम पाहता, तेव्हा झोपेत असता, परंतु तुमचा मेंदू एकप्रकारे जागा असतो. जे काही घडतेय ते खरे नसून एक स्वप्न असल्याची पूर्ण जाणीव तुम्हाला असते.
ल्युसिड ड्रीममध्ये लोक काय करतात?
स्वप्नांदरम्यान जागरुक होऊनही लोक अनेकदा खऱ्या जीवनात जे शक्य नाही, अशी कामे करतात. उदाहरणार्थ उडणे, भिंतींच्या आरपार जाणे, कुठल्याही मनाजोग्या ठिकाणी त्वरित पोहोचणे, पसंतीच्या व्यक्तीला भेटणे किंवा बोलणे, स्वत:च्या भीतीचा सामना करणे.
ल्युसिड ड्रीमचे फायदे
वाईट स्वप्नांमधून मुक्तता : जर तुम्ही एखादे भीतीदायक स्वप्न पाहत असाल आणि हे केवळ एक स्वप्न असल्याची जाणीव झाल्यास तुम्ही त्या भीतीमधून बाहेर पडू शकता किंवा स्वप्नाला बदलू शकता.
रचनात्मक वाढविणे : हा प्रकार तुमच्या कल्पनेच्या जगताला एक्सप्लोर करण्याची एक उत्तम पद्धत आहे.
चिंता कमी करणे : काही लोक याचा वापर स्वत:च्या चिंता आणि भीतींचा सामना करण्यासाठी एका सुरक्षित वातावरणाच्या स्वरुपात करतात.
कौशल्याचा अभ्यास : काही अॅथलिट आणि कलाकार स्वत:च्या कौशल्याचा अभ्यास करण्यासाठी ल्यूसिड ड्रीमिंगचा वापर करतात.
याची मुख्य वैशिष्ट्यो
जागरुकता : तुम्हाला तुम्ही एका स्वप्नाच्या जगात आहात हे माहित असते. हे सामान्य स्वप्नांच्या अत्यंत वेगळे आहे, जेथे आपण प्रत्येक गोष्ट खरी मानतो.
नियंत्रण : आपण स्वप्न पाहतोय हे जेव्हा कळते, तेव्हा अनेकदा त्या स्वप्नाला स्वत:च्या मर्जीनुसार बदलू शकता. स्वप्नात पुढे काय घडणार हे ठरवू शकता. आपणच आपल्या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि नायक असण्यासारखा हा प्रकार आहे.