शब्दांची ‘चव’ घेणारी महिला
अजब आजारामुळे काही बोलताच तोंडात येतो ‘स्वाद’
जगात अनेक प्रकारचे लोक आहेत, काही जणांना अशाप्रकारचे आजार असतात, जे अत्यंत विचित्र वाटू लागतात. एक अशाच महिलेने स्वत:च्या विचित्र स्थितीविषयी सांगितल्यावर लोकांना असेही घडू शकते यावर विश्वास ठेवणेच अवघड ठरले आहे.
सराह गैन नावाच्या महिलेला विचित्र आजार ओ. लोक जेव्हा शब्दांना बोलून व्यक्त होतात, तर सराहच्या तोंडात प्रत्येक शब्दाचा वेगळा स्वाद आहे. मेंदूतील एका कंडिशनुमळे जेव्हा ती काही बोलते, तेव्हा त्याच्याशी संबंधित एक स्वाद तिच्या तोंडात निर्माण होतो.
30 वर्षीय सराह गैन एक प्राथमिक शिक्षिका आहे. माझा मेंदू एका वेगळ्याच डिसऑर्डरला सामोरा जात आहे, यामुळे प्रत्येक शब्दाची वेगळी चव मी ओळखू शकते असे सराह सांगते. तिचा 27 वर्षीय प्रियकर जॅकबर क्लेटनचे नाव तिला कागदासारख्या स्वादासारखे वाटते. ब्ल्यू हा शब्द ऐकताच किंवा पाहताच तिला तो चॉकलेटप्रमाणे स्वादिष्ट वाटू लागतो. तर क्राँक्रिट हा शब्द तिला दूधात बुडविलेल्या बिस्किटाप्रमाणे वाटतो. अशाचप्रकारे वेगवेगळे शब्द तिला दूध, चॉकलेट मिल्क, फ्रूट जेली यासाख्या गोष्टींची स्वाद चाखवत असतात.
अमेरिकेच्या अर्कांसस येथे राहणारी सराह दोन मुलांची आई आहे. बालपणापासूनच मी शब्दांची स्वाद चाखत होते असे तिचे सांगणे आहे. या स्थितीला सायनेस्थिया म्हटले जाते, जो एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, यामुळे माणसाचा मेंदू शब्दांना स्वादाशी जोडत असतो आणि वेगवेगळ्या शब्दांना ऐकल्यावर किंवा वाचल्यावर वेगवेगळे स्वाद जाणवू लागतात.