कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाण्याचा द्वेष करणारी महिला

06:22 AM Oct 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जल हेच जीवन असल्याने कुणी पाणी पिण्याचाच द्वेष करू शकते का? पाण्याची भीती वाटण्याच्या प्रकाराला हायड्रोफोबिया म्हटले जाते, परंतु पाणी पिण्याचा द्वेष करण्याचा प्रकार 52 वर्षीय ट्रायथलीट लोरी चीकसोबत घडतो. ती पाण्याचा इतका द्वेष करते की, तिला यामुळे दोनवेळा रुग्णालयात भरती व्हावे लागले आहे आणि आता ती कॉफी आणि बियर पिऊन शरीरातील पाण्याची कमतरता दूर करते. याकरता ती रितसर मोठा खर्चही करते.

Advertisement

Advertisement

मला लोकांच्या मताने फरक पडत नाही, लोक पाण्याच्या आवश्यकतेवर गरजेपेक्षा अधिक भरवसा ठेवतात, असे माझे मानणे आहे. पाण्याला हायड्रेशनचे एकमात्र साधन मानले जाते, परंतु हे सत्य नाही. लोक याला रिफ्रेशिंग म्हणू शकतात, परंतु मला असे कधीच वाटले नाही. पाणी माझ्या गळ्यातून खाली उतरताना स्लाइमी आणि बेकार वाटते, मला फ्लेवर हवे असतात असे लोरीचे सांगणे आहे.

लोरीला बालपणापासून पाणी पसंत नव्हते आणि तिचे आईवडिल देखील पाण्यापासून दूर रहायचे. मी कूल-एड आणि पॅप्रिसन यासारख्या फ्लेवर्ड ड्रिंक्सचेच सेवन करत होते. जिममध्ये अधिक मेहनत केल्यावर मला दोनवेळा ऊग्णालयातील इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल व्हावे लागले होते. हा भीतीदायक अनुभव होता आणि हायड्रेशनला कमी न लेखण्याची जाणीव मला झाली. यानंतर मी फ्लेवर्ड पद्धतींनी हायड्रेट राहण्यावर लक्ष देण्यास सुरुवात केल्याचे लोरी सांगते. लोरीचा दिवस कॉफीने सुरू होतो आणि ती दिवसभरात आणखी तीन कप कॉफी पिते. यानंतर ती फ्लेवर्ड वॉटर म्हणजेच क्रिस्टल लाइट किंवा स्पोर्ट्स ड्रिंक आणि बाइक राइडनंतर बियर पित असते. रात्री जेवल्यावर ती पेडियालाइट पॉप्सिकल्स खाते, जेणेकरून इलेक्ट्रोलाइट्स मिळू शकतील. दर महिन्याला हायड्रेशन म्हणून ती सुमारे 13 हजार रुपये खर्च करते, तर पाणी पिण्यासठी काहीच खर्च करावे लागत नाही.

पाण्याची कमतरता दूर करणे

कॉफी आणि बियर देखील पाण्याची कमतरता दूर करण्यास योगदान देतात, कारण यात खास पाणी असते असे ती सांगते. लोरी स्वत:च्या आरोग्याला गांभीर्याने घेते. तिने अलिकडेच हाफ आयर्न मॅन रिलेमध्ये 57 मैलाची बाइक राइड पूर्ण केली आहे. तर सोशल मीडियावर लोरीला पाण्याच्या द्वेषाबद्दल ट्रोल करत असतात.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article