महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

30 वर्षांमध्ये कधीच न झोपलेली महिला

06:32 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

24 तास उघडे राहतात डोळे

Advertisement

तुम्ही ‘स्लीपिंग ब्युटी’ची कहाणी ऐकली असेल, ज्यात राजकन्या झोपलेलीच असते. परंतु एक अशी महिला आहे. जी झोपतच नाही. स्वत:च्या आयुष्यातील 30 वर्षे तिने जागतच काढली आहेत. या महिलेची पूर्ण कहाणी कळल्यावर तुम्हाला विश्वासच बसणार नाही.

Advertisement

व्हिएतनाम येथे राहणाऱ्या महिलेने आपण मागील 30 वर्षांपासून कधीच झोपले नसल्याचा दावा केला आहे. यामागील कारण  कुठलाही आजार नसून तिने स्वत:च्या शरीराला सरावाद्वारे असे केले आहे. हा प्रकार विचित्र वाटत असला तरीही महिलेला असे करण्यास अनेक वर्षे लागली आहेत.

व्हिएतनाम येथील 49 वर्षीय गुएन नगॉक माक किम यांची ही कहाणी आहे. त्या स्वत:च्या गृहक्षेत्रात ‘कधी न झोपणाऱ्या टेलर’ या नावाने ओळखल्या जातात. त्या देखील स्वत:च्या या उपाधीचा आनंदाने स्वीकार करतात. अनेक दशकांपासून मी झोपलेली नाही. न झोपल्याने माझ्या आरोग्याला कुठलेच नुकसान झालेले नाही. तसेच मी आरामात न झोपता राहू शकते. झोपी जाण्याची गरजही मला कधी जाणवत नसल्याचे गुएन सांगतात.

आजार नव्हे सराव

मला न झोपण्याचा आजार नाही. मी लहान असताना रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचे. परंतु मी टेलर झाल्यावर स्वत:च्या ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी कधीकधी पूर्ण रात्र न झोपता काम करायचे. त्यावेळी मला थकवा यायचा आणि माझ्या हातून चुकाही व्हायच्या. परंतु अनेक महिन्यांपर्यंत अशाप्रकारे जागल्यावर माझे शरीर आणि डोळे या प्रकाराला सरावले. आता इच्छा असली तरीही मी झोपू शकत नाही. माझ्या दुकानाची लाइट नेहमी चालू असते आणि दरवाजा सदैव उघडा असतो. कुणीही आत येऊ मला काम करताना पाहू शकतो असे त्या सांगतात.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article