Miraj Crime : मुलांच्या भांडणातून महिलेला काठीने मारहाण; मिरज शहरात गुन्हा दाखल
02:11 PM Dec 04, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement
मिरजमध्ये किरकोळ वादाचे हिंसाचारात रूपांतर;
Advertisement
मिरज : मंगळवार पेठ येथे लहान मुलांमध्ये खेळताना भांडण झाल्यातून महिलेला काठीने मारहाण करुन जखमी करण्यात आले. याबाबत पिडीत महिलेने मिरज शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयीत अर्चना अजय कत्तीरे (रा. मंगळवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल झालाआहे.
पिडीत महिला व संशयीत अर्चना कत्तीरे या एकमेकांच्या शेजारी आहेत. संबंधीत महिलांच्या लहान मुलांमध्ये घरासमोर खेळताना भांडण झाले. यातून संशयीत अर्चना यांनी पिडीत महिलेला शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली. पिडीत महिला जखमी झाली आहे.
Advertisement
Advertisement