लांडग्यांच्या सान्निध्यात राहणारी महिला
रोशफोरचॅट फ्रान्समधील एक छोटेसे गाव असून त्याला ‘मीडिल ऑफ नो व्हेयर’ देखील म्हटले जाते. या गावाची लोकसंख्या केवळ एक असून येथे जोसेट नाव असलेली 65 वर्षीय महिलाच राहते. ही महिला अत्यंत शुरू आहे. कारण या गावात तिच्या व्यतिरिक्त केवळ लांडग्यांचेच वास्तव्य आहे.
फ्रान्समध्ये 35,083 गावं असून यातील सर्वात छोटे गाव म्हणून रोशफोरचॅट ओळखण्यात येते. या गावात केवळ एका महिलेचे वास्तव्य आहे. पूर्ण गावात एक महाल, जुना चर्च आणि दफनभूमी, टेलिफोन बूथ आहे. तर तीन इमारती अत्यंत जीर्ण झाल्या आहेत. या इमारतींपैकी एका इमारतीवर जोसेफ यांचे नियंत्रण आहे. जोसेफ या 2005 पासून याला ‘एकट्याचे स्वर्ग’ संबोधित आहेत. जोसफ यांना शांतता आणि निर्जन वातावरणात राहणे आवडते, याचमुळे त्या या गावात एकट्याच राहतात. त्यांनी स्वत:च्या घरावर सोलर पॅनेल बसविला असून याद्वारे त्या विजेची सुविधा प्राप्त करत आहेत. दुसऱ्या गावातील लोकांना भेटायला जाण्यापूर्वी त्या येथे 15 दिवस एकट्याच राहत असतात.
मी आलिशान जीवनाच्या शोधात नाही. शांततापूर्ण जगण्याची माझी पद्धत इतर लोकांमध्ये ईर्ष्या निर्माण करते. मी या गावात एकटीच राहते, परंतु मी काही साधू संत नसल्याचे जोसेफ सांगतात. जोसेफ यांच्याकडे एक श्वान असून तो त्यांच्यासोबत कायम असतो. जोसेफ यांना अन्नधान्याची गरज भासल्यावर त्या स्वत:च्या घरापासून 6 किलोमीटर अंतरावरील एका गावातून सामान खरेदी करून आणत असतात.
परंतु जोसेफ यांचे कुटुंबीय त्यांना वेळोवेळी भेटायला येत असतात. तसेच त्या रानडुक्कराची शिकार करण्यासाठी जात असतात. रोशफोरचॅटमधील काही घरांचे मालक असून ज्यात महापौर जीन-बॅप्टिस्ट डी मार्टिग्नी यांचाही समावेश आहे. जे येथील ‘एक-व्यक्ती साम्राज्या’च्या अधिकृत कामांना पूर्ण करण्यासाठी येथे काही महिन्यांमधून येत असतात. या गावाची लोकसंख्या 3 होण्याची शक्यता आहे, 2 लोक या गावात राहण्याचा विचार करत आहेत.