पर्वतावर एकटीच राहणारी महिला
वीज-इंटरनेटशिवाय जगतेय : अनेक मैल दूर जात करतेय शॉपिंग
सद्यकाळात कुणी इंटरनेट किंवा विजेशिवाय जगत असेल तर तुम्ही त्याला खोटारडे किंवा मूर्ख ठरवाल. परंतु आजही काही लोक निसर्गादरम्यान तंत्रज्ञान आणि शहरातील गर्दीपासून दूर राहणे पसंत करतात. अशा लोकांना पाहून प्रत्येक जण दंग होत असतो. अशाच प्रकारची लाइफस्टाइल ब्रिटनमधील एका महिलेची आहे. ही महिला 49 वर्षीय असून स्वत:च्या पाळीव श्वानासोबत ती पर्वतावर एकट्याच घरात राहत आहे. तिच्यापासून सर्वात जवळचे घर अनेक किलोमीटर अंतरावर आहे.
सू एडवर्ड आणि त्यांचा पाळीव श्वान जूरा ब्रिटनच्या लेक डिस्ट्रीक्टमध्ये राहतात. त्या ज्या घरात राहतात, त्याचे नाव स्किडॉ हाउस असून ते 1550 फूट उंचीवर आहे. घरापासून सर्वात नजीकचा रोड सुमारे 5 किलोमीटर अंतरावर आहे. तेथे जाण्यासाठी 4गुणिले4 पिकअॅप व्हॅन सारख्या वाहनांचीच गरज भासते, जे ओबडधोबड रस्त्यांवरून धावू शकेल. हे घर प्रत्यक्षात एक हॉस्टेल असून जेथे लोक वीपेंडमध्ये येऊन राहू शकतात. सू याची देखभाल करतात.
हॉस्टेलमध्ये वीज नसल्याने सोलर पॅनेलद्वारे त्या स्वत:साठी वीज निर्माण करतात. याचबरोबर पेयजलाचा पुरवठा नसल्याने नजकीच्या झऱ्यातील पाण्याचा वापर केला जातो. मागील अडीच वर्षांपासून सू यांनी स्वत:च्या घराला हॉस्टेलमध्ये रुपांतरित केले आहे. जवळपास इंटरनेटशिवाय त्या जगत आहेत. सुमारे एक महिन्यात त्या 10 एमबीपर्यंत वायफाय डाटा वापरतात. त्यांच्याकडे व्हॉट्सअँप आहे, परंतु त्यावर जेव्हा कुणी अधिक व्हिडिओ पाठवून देतो, तेव्हा ते डाउनलोड करणे त्यांच्यासाठी अवघड ठरते.
1829 मधील घर
दर मंगळवारी त्या घरासाठी आठवडाभर पुरेल इतके धान्य नजीकच्या सुपरमार्केटमधून आणतात, तेथे कारने जाण्यासाठी त्यांना 50 मिनिटांपर्यंतचा कालावधी लागतो. सू एका शेतकऱ्याच्या कन्या होत्या, परंतु त्यांना शेतकऱ्याचे काम कंटाळवाणे वाटायचे. 18 वर्षे वय असताना त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला, त्यानंतर त्या हॉस्टेल्समध्ये काम करू लागल्या. या हॉस्टेलच्या जुन्या वॉर्डन यांना मूल झाल्याने त्यांनी नोकरी सोडली होती. हे घर 1829 मध्ये निर्माण करण्यात आले होते. तेव्हा हे कीपर्स लॉज आणि ग्राउस शूटिंग बेस होते. इमारतीला दोन भागांमध्ये विभागण्यात आले होते, एक भाग गेमकीपर अणि त्याच्या परिवारासाठी आणि दुसरा भाग शेफर्ड आणि परिवारासाठी होता. 1957 मध्ये घराला एका स्थानिक शेतकऱ्याने विकत घेतले होते. तो दीर्घकाळापर्यंत तेथे राहत होता. आता सू त्या घराची देखभाल करतात. त्यांचे स्वत:चे घर इंग्लंडच्या यॉर्कमध्ये असून तेथे त्या हिवाळ्यात जातात. तेवहा ही जागा केवळ प्रायव्हेट भाड्याचे हॉस्टेल म्हणून दिले जाते.