पांढरा वाघ, बिबट्या, रानमांजर, पर्वतीय श्वानासह महिलेचे वास्तव्य
रॉयल बंगाल टायगर, बिबट्या, दोन रानमांजरं आणि एका पर्वतीय श्वानासोबत एक महिला अत्यंत आरामात एकाच छताखाली वास्तव्य करते. हे वाचल्यावर विचित्र वाटेल परंतु हेच सत्य आहे. हे हिंसक प्राणी घरात कुठल्याही बंधनाशिवाय हिंडत असतात. महिलेला या प्राण्यांपासून कुठलाच धोका जाणवत नाही, या प्राण्यांना ती स्वत:च्या मुलांप्रमाणे पाळते. युक्रेनमध्ये राहणाऱ्या या चिनी महिलेला या प्राण्यांबद्दल विशेष ओढ आहे. या महिलेचे नाव गोंग आहे. गोंग चिनी सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असते. तसेच ती स्वत:च्या या पाळीव प्राण्यांसोबत रील्स तयार करत शेअर करत असते. गोंगने रॉयल बंगाल टायगरसोबत स्वत:च्या दिनचर्येचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्याकडे असलेला बंगाल टायगर हा पांढरा वाघ असून तिने तो 1 कोटी 20 लाख रुपयांमध्ये खरेदी केला आहे.
2000 चौरस मीटरचे उद्यान
गोंग स्वत:च्या पाळीव प्राण्यांसोबत युक्रेनमधील एका मोठ्या घरात आरामात राहते. तिचे घर मुख्य शहरापासून काही अंतरावर आहे. हा व्हिला एक पांढरा वाघ, दोन रानमांजर, एक बिबट्या आणि एक बर्नीज माउंटेन डॉगचे घर आहे. तिच्याकडे व्हिलासोबत 2 हजार चौरस मीटरचे एक उद्यान आणि प्राण्यांच्या मनोरंजनासाठी एक पूल देखील आहे.
गोंगने स्वत:च्या पांढऱ्या वाघिणीचे नाव तिच्या किमतीमुळे ‘मिलियन गेंग’ ठेवले आहे. कारण तिने या वाघिणीला खरेदी करण्यासाठी 9 हजार अमेरिकन डॉलर्सची अतिरिक्त रक्कम खर्च केली होती. स्थानिक अधिकारी नियमित स्वरुपात प्राण्यांच्या वास्तव्याच्या स्थितीची तपासणी करत असतात. माझ्या प्रियकराने युक्रेनमध्ये शिक्षण घेतले आहे आणि तेथेच राहत मालमत्ता खरेदी केली आहे. मी भाड्याचा व्यवसायही चालविते, असे गोंगने सांगितले.
पशूंसोबत तयार करते कंटेंट
हे जोडपे आता कंटेंट क्रिएटरच्या स्वरुपात काम करत आहे, जेणेकरून या प्राण्यांसोबत अधिक वेळ घालविता येईल. मागील वर्षी एप्रिलमध्ये जन्मलेली वाघिण आता जवळपास 70 किलाग्रॅम वजनाची असून तिचे वजन पुढील काही काळात 150 किलोग्रॅमपर्यंत पोहोचू शकते. ती सध्या व्हिलाच्या आत राहते. परंतु तिच्यासाठी एक विशेष आउटडोअर परिसर तयार करण्याची गोंगची योजना आहे.
वाघिणीवर महिन्याला लाखाचा खर्च
पांढरे वाघ आता जंगलात राहिलेले नाहीत आणि प्राणिसंग्रहालयातही केवळ 200 च शिल्लक राहिले आहेत. चिनी संस्कृतीत पांढऱ्या वाघांना शक्ती आणि न्यायाचे पवित्र प्रतीक मानले जाते. या प्राण्याच्या मासिक भोजनाचे बिल जवळपास 1 लाख 70 हजार रुपये आहे.
गोंगची पाळते आज्ञा
गोंगने स्वत:च्या मिलियन गोंगला प्रशिक्षित केले आहे. वाघिणीच्या डिस्पोजबल मॅटवर दर महिन्याला 170 डॉलर्स खर्च होतात. मिलियन गोंग अनेकदा फर्निचरला नुकसान पोहोचविते, यामुळे तिच्या देखभालीचा खर्च वाढतो. जर कुठलाही साथीदार मिळाला नाही, तर तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागू शकते असे गेंगने सांगितले. तसेच वाघिण माझा प्रत्येक इशारा समजते असे त्यांनी सांगितले आहे.