कापलेल्या नाकासोबत जगते महिला
जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटता, तेव्हा सर्वप्रथम इम्प्रेशन त्याच्या चेहऱ्यावरूनच तयार करत असतात. जर एखादा व्यक्ती दिसण्यास चांगला असेल तर लोक त्याला चांगले समजत असतात. परंतु तो जरा विचित्र दिसत असल्यास त्याची चेष्ट केली जाते. असाच प्रकार एका महिलेसोबत घडत आहे. या महिलेने शस्त्रक्रियेद्वारे स्वत:चे नाकच चेहऱ्यापासून वेगळे केले आहे.
या महिलेचे नाव टीना अर्ल्स असून ती अमेरिकेची रहिवासी आहे. तसे ती सामान्य लोकांप्रमाणेच आहे, परंतु जेव्हा तुम्ही तिच्या चेहऱ्याकडे पहाल तेव्हा धक्का बसेल. नाकाच्या जागी एक मोठे छिद्र पाहिल्यास चकित व्हाल. हे छिद्र पाहणाऱ्यांना अजब वाटत असले तरीही टीनाच्या व्यक्तिमत्त्वाचा आता ते हिस्सा ठरले आहे. याच्याच साथीने ती आता जगत आहे.
नाकाच्या जागी छिद्र
टीना अर्ल्सला 2014 साली स्वत:ला स्टेज टू लेव्हलचा नेजल कॅन्सर असल्याचे समजले होते. अशा स्थितीत तिने रेडिओथेरपी करविली असती तर याचा प्रभाव दृष्टीक्षमता, मेंदू आणि तोंडावर पडला असता. यामुळे तिने एक मोठा निर्णय घेत स्वत:चे पूर्ण नाकच शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकले. सर्वसाधारपणे अशाप्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर लोकांना प्रॉस्थेटिक नोज दिले जाते, परंतु टीनाने नकली नाक बसविलेले नाही. याच्या जागी ती कधीकधी पॅचचा वापर करते.
कशाप्रकारे घेते श्वास?
टीनाने केवळ दोन वर्षांपर्यंत नकली नाक लावले, यामुळे तिच्या त्वचेवर इरिटेशन व्हायचे. अशा स्थितीत तिने पॅचचा ऑप्शन निवडला, ती श्वास कशाप्रकारे घेते अशी विचारणा लोक करत असतात. नाकाच्या मोठ्या छिद्राद्वारे सहजपणे श्वास घेत असल्याचे तिने सांगितले आहे. अनेकदा तिला या छिद्रात बोटं घालून सफाई करावी लागते, यामुळे तिला वेदना होतात. याचबरोबर स्वयंपाक करताना, जेवताना, पोहताना तिला यामुळे कुठलाच त्रास होत नाही.