कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बसच्या धडकेने शाहूनगरची महिला ठार

10:53 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रस्ता ओलांडताना चन्नम्मा चौकात अपघात : घटना सीसीटीव्हीत कैद

Advertisement

बेळगाव : सिटी बसने ठोकरल्याने शिवनेरी गल्ली, शाहूनगर येथील एक वृद्धा जागीच ठार झाली. सोमवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास चन्नम्मा सर्कल परिसरात ही घटना घडली. अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाला आहे. शालन शांताराम देसाई (वय 73) रा. शाहूनगर असे त्या दुर्दैवी वृद्धेचे नाव आहे. कामानिमित्त त्या शाहूनगरहून चन्नम्मा सर्कलपर्यंत आल्या होत्या. चालत रस्ता ओलांडताना सीबीटीकडे जाणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसने त्यांना धडक दिली. त्यानंतर बसच्या चाकाखाली सापडून त्या चिरडल्या गेल्या. या अपघातानंतर चन्नम्मा सर्कल परिसरात काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेची माहिती समजताच वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस उपनिरीक्षक महांतेश मठपती व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. तातडीने वृद्धेचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला. काही तासात मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. शालन यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी 8 वा. सदाशिवनगर स्मशानभूमीत होणार आहे. सिव्हिल हॉस्पिटल रोडवरून सीबीटीकडे जाणाऱ्या बसने ठोकरल्याने हा अपघात झाला असून संपूर्ण घटना चन्नम्मा सर्कलमधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चालत रस्ता ओलांडताना बसची धडक बसली. त्यानंतर त्या बसच्या चाकाखाली सापडल्या. वाहतूक उत्तर विभाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article