महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

परिवहन मंडळाच्या महिला बसवाहकाला मारहाण

10:36 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सौंदत्ती तालुक्यातील घटना

Advertisement

बेळगाव : परिवहन मंडळाच्या महिला बसवाहकाला मारहाण करण्यात आली आहे. सौंदत्ती तालुक्यातील हिडनाळजवळ ही घटना घडली असून सौंदत्ती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मात्र, पोलिसांनी संबंधितांवर अद्याप कारवाई केली नाही, असा आरोप केला जात आहे. दरम्यान, भारतीय संस्कृती फौंडेशनच्यावतीने मारहाण प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. शशिकला आर. (वय 38) मूळच्या रा. जिगळूर, जि. दावणगिरी यांना मारहाण करण्यात आली आहे. 29 जून रोजी दुपारी ही घटना घडली. शशिकला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंगारकोप्प, ता. सौंदत्ती येथील पवित्रा शंकरगौडा पाटील, पती शंकरगौडा पाटील यांच्यासह पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

बसमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीनंतर हिडनाळजवळ बस अडवून महिला वाहकाला मारहाण केली आहे. पोलिसांनी सुरुवातीला एफआयआर दाखल करून घेण्यासही टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेला आठ दिवस उलटले तरी अद्याप कोणावरही कारवाई झाली नाही. वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाच्या अनुसूचित जाती-जमाती नोकर संघटनेने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून आरोपींवर कारवाई करण्यासाठी पोलीसप्रमुखांना पत्र दिले आहे. भारतीय संस्कृती फौंडेशनच्या प्रमोदा हजारे व त्यांच्या सहकाऱ्यांनीही गुरुवारी जिल्हा पोलीसप्रमुखांना निवेदन देऊन महिला बसवाहकाला मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article