For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यजमान बांगलादेशची विजयी सलामी

06:22 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
यजमान बांगलादेशची विजयी सलामी
Advertisement

वृत्तसंस्था/ चेतोग्राम

Advertisement

यजमान बांगलादेश आणि झिंबाब्वे यांच्यात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत बांगलादेशने 8 गड्यांनी दणदणीत विजय मिळवित विजयी सलामी दिली. बांगलादेशच्या तस्किन अहमदला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून झिंबाब्वेला प्रथम फलंदाजी दिली. झिंबाब्वेचा डाव 20 षटकात 124 धावांत आटोपला. त्यानंतर बांगलादेशने 15.2 षटकात 2 बाद 126 धाव जमवित 28 चेंडू बाकी ठेऊन हा सामना एकतर्फी जिंकला.

Advertisement

झिंबाब्वेच्या डावामध्ये क्लाईव्ह मेदांडेने 39 चेंडूत 6 चौकारांसह 43, वेलिंग्टन मासाकेझाने 38 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 34, बेनेटने 15 चेंडूत 3 चौकारांसह 16 तर गुंबेने 14 चेंडूत 4 चौकारांसह 17 धावा जमविल्या. झिंबाब्वेच्या डावात 2 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे तस्किन अहमद आणि मोहम्मद सैफ्फूद्दिन यांनी प्रत्येकी 3 तर मेहदी हसन मिराझने 16 धावांत 2 गडी बाद केले. पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात झिंबाब्वेने 38 धावा जमविताना 4 गडी गमविले. झिंबाब्वेचे अर्धशतक 61 चेंडूत तर शतर 105 चेंडूत फलकावर लागले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या डावाला चांलगी सुरुवात झाली नाही. दुसऱ्या षटकात सलामीचा फलंदाज लिटॉन दास मुझारबनीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 1 धावा जमविली. टी. हसन आणि नजमुल हुसेन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 8 षटकात 52 धावांची भागिदारी केली. जाँग्वेने नजमुल हुसेन शांतोला विल्यम्सकरवी झेलबाद केले. त्याने 24 चेंडूत 1 चौकारासह 21 धावा जमविल्या. त्यानंतर टी. हसन व रिदॉय या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 6 षटकात अभेद्य 69 धावांची भागिदारी करुन विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. टी. हसनने 47 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 67 तर रिदॉयने 18 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 33 धावा झळकविल्या. बांगलादेशच्या डावात 3 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. झिंबाब्वेतर्फे मुझारबनी आणि जाँग्वे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. बांगलादेशने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 35 धावा जमविताना 1 गडी गमाविला. बांगलादेशचा डाव सुरु झाल्यानंतर 3 षटकांचा खेळ झाला असताना. पावसाचा अडथळा आला. पण पुन्हा काही वेळाने पावसाने विश्रांती घेतल्याने उर्वरित खेळ सुरळीत पार पडला. बांगलादेशचे अर्धशतक 46 चेंडूत तर शतक 77 चेंडूत फलकावर लागले. टी. हसनने आपले अर्धशतक 36 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने झळकवले.

संक्षिप्त धावफलक - झिंबाब्वे 20 षटकात सर्वबाद 124 (क्लाईव्ह मंदाडे 43, मासाकेझा 34, बेनेट 16, गुंबे 17, तस्किन अहमद 3-14, मोहम्मद सैफुद्दीन 3-15, मेहदी हसन मिराझ 2-16). बांगलादेश 15.2 षटकात 2 बाद 126 (टी. हसन नाबाद 67, दास 1, रिदॉय नाबाद 33, नझमुल हुसेन शांतो 21, अवांतर 4, मुझार बनी व जाँग्वे प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.