कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डिजीटल अरेस्टच्या भितीने तब्बल २७ लाख उकळले

02:59 PM Sep 10, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सांगली :

Advertisement

फौजदारी स्वरुपाचा गुन्हा केल्याने तुमच्याविरोधात अटक वॉरंट असून अटक टाळण्याकरता एका वृध्दाकडून तब्बल २७लाख रुपये उकळण्यात आल्याचा डिजीटल अरेस्टचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत लक्ष्मण विठ्ठल कुलकर्णी (वय ८२, रा. आशीर्वाद, प्लॉट क्र. ९, श्री शिल्प चिंतामणी को ऑप सोसायटी, विजयनगर, सांगली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. पोलिसांनी बनावट अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

फिर्यादी लक्ष्मण कुलकर्णी यांना रविवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या Fake Police/ED CB/Chime Branch सुमारास एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. त्यानंतर काही वेळात व्हाईस मेसेज आला. त्यामध्ये तुमचा मोबाईल दोन तासात बंद होणार असून अधिक माहितीसाठी मेसेजमध्ये देण्यात आलेला ९ क्रमांक दाबा असे सूचित केले होते.

अधिक माहितीसाठी फिर्यादी लक्ष्मण कुलकर्णी यांनी ९ क्रमांक दाबला. त्यावेळी फोन सुरु झाला. पलिकडील व्यक्तीने, मी मुंबई येथून रिइनफोर्समेंट अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. तसेच दि. ५ जुलै रोजी खारघर येथील बँकेत तुम्ही खाते काढून त्या माध्यमातून सहा कोटींची उलाढाल करून नरेश गोयल या व्यक्तीस बेकायदा मदत केल्याची माहिती दिली.

सदरचा आर्थिक व्यवहार हा फौजदारी स्वरुपाचा गुन्हा असल्याने यामध्ये अटक झाल्यास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा तुम्हाला होणार असल्याची भिती भामट्याने कुलकर्णी यांना घातली. तुमच्याविरोधात माझ्याकडे अटक वॉरंट असून अटक टाळायची असेल तर मी सांगतो त्या पध्दतीने करण्यास सांगितले.

फोनवरुन बोलणाऱ्या भामट्याने कुलकर्णी यांना एक खाते क्रमांक दिला आणि त्यावर २७ लाख रुपये तातडीने भरण्यास सांगितले. सध्या तुमच्या प्रकरणाचा तपास सुरु असून यामध्ये कोणताही गैरव्यवहार आढळला नाही तर तुम्ही भरलेले सर्व पैसे पुन्हा तुमच्या खात्यावर ट्रान्सफर करण्याची हमी दिली.

घाबरलेल्या फिर्यादी लक्ष्मण विठ्ठल कुलकर्णी यांनी भामट्याने सांगितल्यानुसार त्याच्या बँक खात्यावर २७ लाख रुपये भरले. त्यानंतर फोन बंद करण्यात आला. वारंवार पाठपुरावा करुनही पलीकडून काहीच प्रतिसाद न आल्याने फसवणूक झाल्याचे लक्ष्मण कुलकर्णी यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जावून संशयित अधिकाऱ्याविरोधात फिर्याद दिली.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article