‘फेड’च्या निर्णयानंतर भारतीय बाजारात तेजीची लाट
सेन्सेक्स व निफ्टी विक्रमी कामगिरी करत बंद : फेडरलचा व्याजदर कपातीचा निर्णय
वृत्तसंस्था/मुंबई
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक यांच्याकडून चार वर्षांपेक्षा सर्वाधिक कालावधीत पहिल्यांदाच व्याजदर कपातीची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर जागतिक पातळीवरील वातावरणाचा कल सकारात्मक होत बंद झाला. यामुळे चालू आठवड्यातील गुरुवारच्या दिवशी बाजाराची दिशा पूर्णपणे बदलून जात भारतीय शेअर बाजारात तेजी परतली. सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक गुरुवारी विक्रमी पातळी गाठत बंद झाले.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर गुरुवारी विक्रमी टप्पा प्राप्त करत बंद झाला. 30 समभागांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 236.57 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.29 टक्क्यांसोबत 83,184.80 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 38.25अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 0.15 टक्क्यांच्या कामगिरीसह 25,415.80 चे नवे शिखर प्राप्त करत बंद झाला आहे.
सेन्सेक्समध्ये 30 समभागांपैकी 19 समभाग वधारले आहेत. यात एनटीपीसी, कोटक बँक, टायटन, नेस्ले इंडिया आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग पहिल्या पाच मध्ये सर्वाधिक मजबूत राहिले. यासह मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक, एशियन पेन्ट्स, भारती एअरटेल, सनफार्मा, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, पॉवरग्रिड कॉर्प, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह आणि इन्फोसिस यांचे समभाग वधारुन बंद झाले.
अन्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील 30 मधील 11 समभाग हे प्रभावीत झाले आहेत. यामध्ये अदानी पोर्टस, लार्सन अॅण्ड टुब्रो, टीसीएस, जेएसडब्ल्यू स्टील आणि एचसीएल टेक यांचे समभाग पहिल्या पाचमध्ये नुकसानीत राहिले. यासह टाटा स्टील, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, स्टेट बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले.
जागतिक बाजारांची स्थिती :
गुरुवारच्या सत्रात आशियातील बाजारांमध्ये सियोल, टोकीओ, शांघाय आणि हाँगकाँग यांचे निर्देशांक वधारले आहेत. तसेच दुपारी युरोपीयन बाजार वरच्या पातळीवर राहिला होता. बुधवारी अमेरिकन बाजार घसरणीसह बंद झाला होता.
भारतावर कमी प्रभाव : मुख्य आर्थिक सल्लागार
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकने व्याजदर कपात केली आहे. यावर प्रतिक्रीया देताना, भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वर यांनी म्हटले आहे, की फेडच्या व्याजदर कपातीच्या निर्णयाचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही. भारतीय शेअर बाजार अगोदरच गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यशस्वी झाला आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- एनटीपीसी 424
- कोटक महिंद्रा 1872
- टायटन 3781
- नेस्ले 2634
- मारुती सुझुकी 12321
- हिंदुस्तान युनि 2911
- एचडीएफसी बँक 1708
- सनफार्मा 1844
- भारती एअरटेल 1665
- एशियन पेन्ट्स 3300
- टाटा मोटर्स 967
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2939
- अॅक्सिस बँक 1245
- इंडसइंड बँक 1484
- आयसीआयसीआय 1484
- आयटीसी 508
- पॉवरग्रिड कॉर्प 335
- बजाज फिनसर्व्ह 1890
- इन्फोसिस 1894
- अल्ट्राटेक सिमेंट 11630
- मॅक्स हेल्थकेअर 984
- डाबर इंडिया 664
- अशोक लेलँड 237
- हॅवेल्स इंडिया 2000
- वेदान्ता 449
- आयशर मोटर्स 4864
समभाग घसरलेल्या कंपन्या
- लार्सन अॅण्ड टुब्रो 3682
- टीसीएस 4296
- एचसीएल टेक 1740
- जेएसडब्ल्यू स्टील 946
- विप्रो 533
- टाटा स्टील 149
- टेक महिंद्रा 1595
- महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 2798
- स्टेट बँक 790
- बीपीसीएल 324
- ल्यूपिन 2168
- आयआरसीटीसी 883
- पॉवर फायनान्स 480
- कोल इंडिया 478
- अंबुजा सिमेंट 609