महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाण्यात माशाप्रमाणे पोहू शकणारा ‘वॉटरप्रूफ’ पक्षी

06:45 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

न बुडणारा तसेच न भिजणारा

Advertisement

पूर्ण जगात पक्ष्यांना त्यांचे सौंदर्य आणि त्यांच्या  उडण्याच्या क्षमतेमुळे ओळखले जाते, परंतु एक पक्ष आकाशात उडण्यासोबत पाण्याच्या आत पोहू शकतो. या पक्ष्याचे नाव पफिन बर्ड आहे. पफिनबर्ड आकाशात उडण्यासोबत पाण्यात तरंगू शकतो. पफित खासकरून उत्तर अटलांटिक महासागरात आढळून येतात. हा पक्षी छोट्या माशांची शिकार करण्यासाठी पाण्यात 200 फूट खोलवर जात असतात.

Advertisement

पफिनला पाण्यात तरंगण्यात कुठलीच समस्या होत नाही. या पक्ष्याकडे छोटे आणि परिपूर्ण पंख असतात, त्यांच्या मदतीने तो पोहत असतो. हा पक्षी पाण्यात छोट्या माशांची शिकार करतो. तर पोहता-पोहता तो माशांच्या शोधात 200 फूटांच्या खोलीपर्यंत पोहोचतो.

पफिन्सला त्यांच्या रंगीत त्रिकोणीय आकाराच्या चोचीमुळे ‘सागरी पोपट’ देखील म्हटले जाते. पफिन्स सागरी पक्षांचा एक समुह असून तो एल्सिडे फॅमिलीचा हिस्सा आहे, ज्यांना औक्स नावाने देखील ओळखले जाते. पफिन्सची मोठी आणि चमकणाऱ्या रंगाची आणि त्रिकोणीय चोच असते, ज्यावर लाल, पिवळा, नारिंगी आणि निळा रंग असतो. चोचेची लांबी 29-34 सेंटीमीटर आणि पंखांचा फैलाव 21-24 इंचापर्यंत असू शकतो.

पफिन पक्षी उत्तर अटलांटिक महासागरात आढळतो. हा पक्षी किनारी खडकांमधील भेगा किंवा मातीतल्या बिळांमध्ये घरटे तयार करून राहत असतो. पफिन्स पक्षी सर्वसाधारणपणे 30 सेकंद किंवा त्याहून कमी कालावधीपर्यंत पाण्याच्या आत राहू शकतात. परंतु 200 फूट खोलवर जाण्यात आणि एक मिनिटापर्यंत खाली राहण्यास सक्षम असतात. पफिन्स आकाशातही वेगाने उडू शकतात. आकाशात ते 55-90 मैल प्रतितासाने विहार करू शकतात.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article