1 सेकंदात 19300 लिटर पाणी कोसळणारा धबधबा
आइसलँडमधील डेटिफॉस या धबधब्याला जगातील सर्वात शक्तिशाली धबधबा मानले जाते. वट्नायोकुल नॅशनल पार्कमधील हा धबधबा स्वत:च्या विशाल आकारासाठी प्रसिद्ध आहे. 100 मीटर रुंद आणि 45 मीटर उंच या धबधब्यामुळे आसपासचे खडकही याच्या कंपनामुळे थरथरत असतात. याचा वेग पाहून पाणी थेट जमिनीला चिरून पाताळलोकात जात असल्याचे वाटू लागते. चित्रपट ‘प्रोमेथियस’मध्ये दाखविण्यात आलेला हा धबधबा आता पर्यटक आणि वैज्ञानिकांना आकर्षित करतो.
वट्नायोकुल नॅशनल पार्क हा उत्तर-पूर्व आइसलँडमध्ये असून तेथील फ्योलम नदीवर डेटिफॉस हा धबधबा आहे. ही नदी वट्नायोकुल ग्लेशियरमधून उगम पावते. ही नदी उत्तर-पूर्व आइसलँडच्या मोठ्या भागातून पाणी जमा करते. डेटिफॉसचा सरासरी जलप्रवाह 193 घनमीटर (1 लाख 93 हजार लिटर) प्रति सेकंद आहे. यामुळे हा युरोपमधील सर्वाधिक पाणी असलेला धबधबा ठरला आहे.
हवामान उष्ण होताच किंवा ज्वालामुखीय हालचालींमुळे वट्नायोकुल ग्लेशियर वितळतो आणि याचा प्रवाह आणखी वाढतो. याचे पाणी नेहमी दाट रंगाचे असते, कारण यात गाळ आणि अवशेष असतात, जो पांढऱ्या फेसासह आकर्षक रंगसंगती निर्माण करतो. कॅन्यनच्या टेकड्या याला दोन्ही बाजूने घेरतात, यामुळे पूर्ण दृश्य पश्चिम काठावरून दिसून येते. तेथून थोडेसे पायी चालल्यावर लावा धरण आणि फॉल्टलाइनपर्यंत पोहोचता येते.
पूर्व काठावर वट्नायोकुल नॅशनल पार्कच्या दिशेला एक माहिती फलक आणि आकर्षक दृश्यासाठी पक्का रस्ता आहे. पश्चिम काठावर कुठलीच सुविधा नाही आणि तेथे उडणाऱ्या थेंबामुळे दृश्य काहीसे अवघड ठरते. दोन्हीकडचा भाग ओबडधोबड असल्याने पायी चालताना खबरदारी बाळगावी लागते.
डेटिफॉसच्या आसपास दोन मोठे झरे आहेत. सेल्फोस काही किलोमीटर दक्षिणेला तर हफ्रागिल्सफोस काही किलोमीटर उत्तरेस आहे. जोकुल्सा नदीच्या काठावर या झऱ्यांमुळे एक आकर्षक दृश्य निर्माण होते. परंतु पूर्व काठ अधिक सुविधाजनक आहे. वट्नायोकुल नॅशनल पार्कचे कर्मचारी येथे पर्यटकांच्या मदतीसाठी सदैव तयार असतात.
2012 मध्ये प्रदर्शित सायन्स-फिक्शन चित्रपट ‘प्रोमेथियस’च्या प्रारंभी दृश्यात डेटिफॉसची भव्यता दाखविण्यात आली आहे. याचमुळे काही लोक याला प्रोमेथियस वॉटरफॉल म्हणत आहेत. उन्हाळ्यात ग्लेशियर वितळू लागल्यावर याचे पाणी काळ्या रंगाचे दिसते, यामुळे तो काहीसा भीतीदायक वाटू लागतो.