सततच्या पावसामुळे कचेरी गल्लीत घराची भिंत कोसळली
11:24 AM May 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : कचेरी गल्ली, शहापूर येथे सततच्या पावसामुळे घराची भिंत कोसळल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. मोहम्मद हनिफ झारी यांच्या घराची भिंत कोसळल्याने घराचे नुकसान झाले. सुदैवाने परिसरात कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु, झारी कुटुंबाला मात्र मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे त्यांनी सरकारकडून नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
Advertisement
Advertisement