बिजगर्णी येथे घराची भिंत कोसळली
11:41 AM Jul 30, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथे अतिवृष्टीमुळे घराची भिंत पडून मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे बिजगर्णी गाव परिसरातील नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली असून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. शुक्रवारी रात्री शिवाजी चौक जानेवाडी रोड येथील विष्णू जोतिबा मोरे यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article