कुठल्याही घराला दरवाजा नसलेले गाव
गुजरातमध्ये खुल्या घरात राहतात लोक
गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये सातडा नावाचे एक गाव आहे. राजकोटपासून 23 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात भैरवदादा मंदिर आहे. या गावाच्या कुठल्याही घराला दरवाजा नाही. याचमुळे या घराला कधीच कुलूप लावले जात नाही. गावात असलेल्या भैरवदादामुळे लोकांचे रक्षण होते. याचमुळे या गावाला सौराष्ट्रातील शनि शिंगणापूर या नावाने देखील ओळखले जाते.
या गावात भैरवदादाचा वास आहे. याचमुळे आमच्या गावात कुणीच चोरी करू शकत नाही. गावात कुठलाच चोर नाही. चोर गावात आला तर त्याला अंधत्व येते. याचमुळे आमच्या गावाला मिनी शनि शिंगणापूर नावाने ओळखले जात असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
चार वर्षांपूर्वी चार चोर गावात पोहोचले होते, परंतु त्यांचा अज्ञात कारणामुळे मृत्यू झाला होता. तर चोर आमच्या गावात चोरीसाठी आला तरीही तो पकडला जातो. आसपासच्या गावात चोरी होते, परंतु आमच्या गावात हा प्रकार घडत नाही. आमच्या गावात कुठल्याही घरात दरवाजा नाही. सर्वांची घरं खुली असतात. या गावातील मंदिरात दर्शन करण्यासाठी ठिकठिकाणाहून लोक येत असतात. आता विदेशातूनही भाविक पोहोचू लागल्याचे ग्रामस्थांचे सांगणे आहे.