पुस्तकांसाठी ओळखले जाणारे गाव
स्पेनमधील उरुएना गाव, लोकसंख्या केवळ 100 अन् विद्यार्थी 9, पुस्तकांच्या दुकानांची संख्या 11
बाजारपेठेत गेल्यावर सर्वांनी पुस्तकांची विक्री करणारी काही दुकाने पाहिली असतील. परंतु कधीच तुम्ही पुस्तकांचे गाव पाहिले आहे का? स्पेनच्या उत्तर-पश्चिमेला स्थित उरुएना गाव पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते. हे गाव पूर्णपणे वेगळे आहे.
या गावातील लोकसंख्या केवळ 100 इतकी असून यातही शाळेत शिकणाऱया विद्यार्थ्यांची संख्या केवळ 9 आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे या छोटय़ाशा गावात पुस्तकांची 11 दुकाने आहेत. लोकांनी पुस्तकालये निर्माण केली आहेत. ओबडधोबड रस्ते आणि 12 व्या शतकातील इमारतींदरम्यान या गावात कुठले दुकान दिसले तर ते केवळ पुस्तक विक्रीचेच असते.
येथे येणारे पर्यटन पुस्तक न वाचता येथून जात नाहीत. पर्यटक या गावातील सुंदर पर्वत आणि निसर्गसौंदर्य पाहण्यापेक्षा या पुस्तकांच्या संसाराला पाहून चकित होतात. या गावातून जाणारे पर्यटक येथे थांबून पुस्तके वाचूनही पुढील प्रवासाला निघत असतात.
मी या गावात जन्मलो तेव्हा येथे कुठलेच बुक स्टोअर नव्हते. लोकांना पुस्तकांपेक्षा अधिक स्वतःची जमीन, शेती आणि प्राण्यांबद्दल प्रेम होते. परंतु आता या गावातील लोक स्वतःची संस्कृती जाणू लागले आहेत. आता येथे पुस्तक मेळा आणि परिषदांचे आयोजन केले जात असल्याचे उद्गार गावचे प्रमुख फ्रान्सिस्को रोड्रिग्स यांनी काढले आहेत.
2021 मध्ये या गावात 19 हजार पर्यटक आले होते, या गावात स्पेनमधील सर्वात मोठे पुस्तक प्रकाशन स्थळ आहे. येथे सुमारे 3 हजारांहून अधिक पुस्तके दरवर्षी प्रकाशित होत असतात.