अत्यंत अद्भूत धबधबा
याहून सुंदर धबबधा असू शकत नाही
आइसलँडच्या हेंगिफॉस धबधब्याला सर्वात अदभूत धबधब्यांपैकी एक मानले जाते. हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच झरा आहे. येथे लाल माती आणि काळ्या बेसॉल्ट पॅटर्नसाठी हा धबधबा ओळखला जातो. हेंगिफॉस वॉटरफॉल हा जणू मंगळ ग्रहावर असल्यासारखे वाटत असल्याचे लोकांचे म्हणणे असते. या धबधब्यातून कोसळणारे पाणही हे दूधाप्रमाणे पांढरे दिसते, तर कोसळल्यावर ते हिरव्या-निळ्या रंगाचे होते. आता याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून तो पाहिल्यावर तुम्ही याहून अधिक सुंदर धबधबा असू शकत नसल्याचे म्हणाल. हेंगिफॉस आइसलँडमधील तिसऱ्या क्रमांकाचा उंच धबधबा आहे. तो फ्लजॉट्सडलश्रेपूरच्या हेंगिफोस्सामध्ये आहे. तो बेसॉल्टिक आच्छादनांनी वेढलेला असून त्यादरम्यान मातीचे पापुद्रे आहेत. धबधब्याचा हा व्हिडिओ मनमोहक आहे. हा धबधबा 128 मीटर उंचीचा असून तो एका उंच खोऱ्यात कोसळतो, याच्या खडकांमध्ये लाल रंगाचे मातीचे पापुद्रे आहेत. बेसॉल्टिक आच्छादन 5-6 दशलक्ष वर्षे जुने असून त्यांची निर्मिती ज्वालामुखी विस्फोटांमुळे झाली असावी. लाल माती असल्याने झऱ्यापर्यंत जाण्याचा मार्ग मंगळ ग्रहावरील स्थितीप्रमाणे वाटत असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. हा सुंदर धबधबा पाहण्यासाठी शेकडो पर्यटक येथे दाखल होत असतात. कारपार्कपासून पायी प्रवास सुरू होतो, तेथून धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे एक तासाचा कालावधी लागतो. हेंगिफॉस कोसळण्यापूर्वी खोऱ्यात खाली एक छोटा झरा असून त्याला लिटलेन्सफॉस म्हटले जाते. झऱ्याच्या चहुबाजूचे दृश्य अद्भूत असून ते बेसॉल्ट स्तंभांनी वेढलेले आहे. सूर्याची किरणे त्यांच्यावर पडताच त्यांचा रंग लाल होऊन जातो.