महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ज्ञानवापी अहवालासंबंधी आज निवाडा अपेक्षित

06:35 AM Jan 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अहवाल सार्वजनिक होणार की नाही याचा आदेश येणार

Advertisement

वृत्तसंस्था/ वाराणसी

Advertisement

ज्ञानवापी संकुलाशी संबंधित एएसआयचा सीलबंद सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक करण्याबाबत शुक्रवारीही कोणताही आदेश आलेला नाही. वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश शनिवारी यासंबंधीचा आदेश देऊ शकतात. यापूर्वी न्यायालयाचा निर्णय गुरुवारी येणार होता, मात्र सुनावणी एका दिवसाने पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आदेशासाठी निश्चित केलेली शुक्रवारची तारीखही पुढे ढकलण्यात आली. आता श्री काशी विश्वनाथ कॉरिडॉरमध्ये असलेल्या ज्ञानवापी मशिदीचा एएसआय सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक करण्याबाबत आज शनिवार, 6 जानेवारीला सुनावणी होणार आहे.

ज्ञानवापी संबंधीच्या अपिलावर सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक करण्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. जिल्हा न्यायालयात बुधवारी एक तास यावर युक्तिवाद झाला. एएसआयने जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात अर्ज दाखल करून सर्वेक्षण अहवाल 4 आठवड्यांपर्यंत सार्वजनिक करू नये, अशी विनंती केली होती. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ज्ञानवापीचा पाहणी अहवाल दोन सीलबंद लिफाफ्यांमध्ये जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात दाखल केला आहे. अहवालाची मागणी केवळ हिंदूच नाही तर मुस्लीम बाजूनेही केली आहे. हिंदू पक्षाने अहवालाची प्रत त्वरित देण्याची विनंती केली होती. मुस्लीम पक्षाने आधी आक्षेप घेतल्यानंतर ईमेल आयडी देऊन अहवाल मागवला. अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीने जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात आक्षेप नोंदवला आहे. प्रतिज्ञापत्र घेऊनच सर्वेक्षण अहवाल द्यावा, अशी विनंती समितीने केली. सर्वेक्षण अहवाल लीक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मीडिया कव्हरेजवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article