For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

पाडव्यानिमित्त बेळगावात जोपासली जाते अनोखी परंपरा

11:41 AM Oct 27, 2022 IST | Rohit Salunke
पाडव्यानिमित्त बेळगावात जोपासली जाते अनोखी परंपरा

बेळगाव प्रतिनिधी - बेळगाव उत्तरचे आमदार अँड.अनिल बेनके यांच्या हस्ते चव्हाट गल्ली येथील चव्हाटा मंदिराचे पूजन करण्यात आले.तसेच दीपावलीच्या पाडव्यानिमित्त बुधवार दि. २६ ऑक्टोबर रोजी सजवलेल्या म्हशींची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी म्हैस मालकांचा श्रीफळ व वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गल्लीतील पंच मंडळी अबालवृद्ध उपस्थित होते. पाडव्यानिमित्त म्हशींची पूजा करून आणि त्यांना सजवून गल्लोगल्ली फिरविले जाते,आणि ही परंपरा अनेक पिढ्यांपासून जपली गेली आहे. म्हैस हे मुके जनावर असले तरी तिचे आपल्या मालकाप्रति प्रेम जडलेले असते आणि म्हणूनच या प्रेमापोटी दिवाळीनिमित्त साजरा केला जाणारा हा उत्सव हा असाच अबाधित रहावा, असे मनोगत या वेळी आमदार अनिल बेनके यांनी तरुण भारतशी बोलताना व्यक्त केले.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.