दिल्लीतील अनोखा टॉयलेट म्युझियम
हजारो वर्षे जुने अजब शौचालय उपलब्ध
दिल्लीत फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत, ऐतिहासिक वास्तू, पार्क आणि म्युझियम देखील आहे. दिल्लीत याचबरोबर एक अजब टॉयलेट म्युझियम देखील आहे. हे म्युझियम केवळ भारतच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. पूर्ण जगायच 10 विचित्र म्युझियम्समध्ये या टॉयलेट म्युझियमचा तिसरा क्रमांक लागतो.
पश्चिम दिल्लीच्या महावीर एन्क्लेव भागात सुलभ इंटरनॅशनल म्युझियम ऑफ टॉयलेट निर्माण करण्यात आले आहे. हे म्युझियम 1992 मध्ये सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर बिंद़ेश्वर पाठक यांनी स्थापन केले होते. याचा संदेश स्वच्छतेशी निगडित आहे. या म्युझियममध्ये ख्रिस्तपूर्व 2500 काळापासून आतापर्यंतचे सर्वप्रकारचे शौचालय दिसून येतील. या म्युझियममध्ये 5 हजार वर्षे जुन्या टॉयलेट सीटपासून मॉडर्न टॉयलेटचे कमोड देखील आहेत.
काही टॉयलेट्स तर दोनमजली आहेत. तर काही टॉयलेटमध्ये कमालीचे नक्षीकाम करण्यात आले आहे. प्रत्येक एका टॉयलेटची अनोखी कहाणी आहे. यात टेबल टॉप टॉयलेट देखील दिसून येईल, जे राजे स्वत:सोबत प्रवासावेळी नेत होते. हे म्युझियम सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खुले असते. या म्युझियममध्ये प्रवेश करण्यासाठी कुठलेच शुल्क आकारले जात नाही. हे म्युझियम दिल्लीच्या दशरथपुरी मेट्रोस्थानकापासून नजीक आहे.