महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑफिसचे टेन्शन दूर करण्यासाठी अनोखा उपाय

06:45 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चिनी कर्मचारी डेस्कवर पिकवतात केळी

Advertisement

चीनमध्ये युवा प्रोफेशनल्सने कामाच्या ठिकाणचा तणाव कमी करण्यासाठी अनोखा उपाय शोधून काढला आहे. येथे लोक स्वत:च्या डेस्कवरच केळी पिकवत आहेत. या प्रकाराला ‘स्टॉप बनाना ग्रीन’ आणि मँडरिनमध्ये ‘टिंग जी जियाओ लू’ म्हटले जाते. मराठीत याचा अर्थ ‘चिंता रोखा’ असा होतो. चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केळी उगविण्याच्या या छंदाविषयी जोरदार पोस्ट करण्यात येत आहेत.

Advertisement

या प्रक्रियेत कर्मचारी कच्च्या केळ्यांचा घड खरेदी करतो आणि त्यांना स्वत:च्या डेस्कवरील पाण्याच्या जारमध्ये ठेवतो. जवळपास एक आठवड्याच्या काळजीपूर्वकद sखभालीनंतर केळी पिकतात आणि खाण्यासाठी तयार होतात. त्यानंतर हे कर्मचारी कार्यालयातही ती वाटून खाऊ शकतात किंवा स्वत:सोबत घरी घेऊन जाऊ शकतात.

सहकाऱ्यांचाही होतो विचार

हा प्रकार चिंता दूर करण्यासाठी आणि स्वत:च्या समस्यांपासून मुक्ती मिळविण्यास मदत करतो. तसेच कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध निर्माण होण्यास मदत होते. सहकाऱ्यांसोबत केळी वाटल्याने संभाषण सुरू होऊ शकते आणि सौहार्दाची भावना वाढू शकते. काही कर्मचारी स्वत: पिकविलेल्या केळ्यांना स्वत:च्या खास सहकाऱ्यांसाठी राखून ठेवतात. तसेच केळ्याच्या सालीवर ते सहकाऱ्यांची नावे लिहितात. यामुळे मैत्रीची भावना वाढत असल्याचा दावा चीनच्या एका कार्यालयातील सुपरवायजरने केला आहे.

मार्केटिंग रणनीति

चीनच्या केळी पिकविण्याच्या या क्रेजने तेथे केळ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तेथील एका स्टोरने 20 हजारपेक्षा अधिक केळ्यांचे घड विकले आहेत.  हा प्रकार मंदीदरम्यान विक्री वाढविण्यासाठी शेतकऱ्यांच्या मार्केटिंग रणनीति अंतर्गत सुरू झालेला असू शकतो असे काही लोकांचे मानणे आहे.

आठवड्यात सरासरी 49 तास काम

वर्कप्लेसला स्वत:नुसार चालविता आल्याने युवांमध्ये या छोट्याशा ठिकाणात आपलेपणा आणि सुरक्षेची भावना निर्माण होण्यास मदत मिळते. यामुळे कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना अधिक आनंदी राहता येते असे मनोवैज्ञानिक यू गुआंगरुई यांनी म्हटले आहे. चीनमध्ये आठवड्यात सरासरी 49 तासांपेक्षा अधिक काम केले जाते. याचमुळे युवा कर्मचारी तणाव कमी करण्यासाठी सातत्याने नवनवे मार्ग शोधत आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article