ऑस्ट्रेलियाच्या संग्रहालयात अनोखा पेंग्विन
करड्या रंगाचे केस, भरभक्कम शरीर
पेंग्विन नाव ऐकताच एक पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या प्राण्याचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. परंतु याहून वेगळा दिसणारा पेंग्विन पाहिला आहे का? सोशल मीडियावर सध्या असाच एक पेंग्विन व्हायरल होत आहे. या अनोख्या पेंग्विनला पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियन अॅक्वेरियममध्ये लोक गर्दी करत आहेत. तर इंटरनेटवरही याची मोठी चर्चा सुरू आहे. पेस्टो नावाचा हा पेंग्विन काही प्रमाणात अत्यंत वेगळा दिसून येतो.
अॅक्वेरियममध्ये प्रेमळ आणि भरभक्कम दिसणारा पेस्टो हा काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पेंग्विनदरम्यान वेगळा दिसून येतो. लोक याला ‘लाइन-बॅकर’ म्हणत आहेत. हा पेंग्विन चॉकलेट ब्राउन रंगाचा आहे. त्याचे शीर त्याच्या परिवाराच्या सदस्यांपेक्षा अधिक मोठे आहे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करणे त्याला अत्यंत पसंत आहे.
हा पेंग्विन जवळपास 9 महिन्यांचा असून त्याचे वजन आताच सुमारे 50 पाउंड आहे. त्याच्या आईवडिलांच्या वजनापेक्षाही हे प्रमाण अधिक आहे. चालू वर्षाच्या प्रारंभी जन्मलेल्या पेस्टोने केवळ स्वत:च्या मनमोहक कृत्यांमुळे नव्हे स्वत:च्या प्रभावशाली आकारासाठी जगभरातील लोकांची मने जिंकली आहेत असे सी लाइफ मेलबर्नने म्हटले आहे.
हे एक जणू मोठे मूल असून तो खूप काही खात आहे. त्याचे वजन आरोग्याला घातक मानले जात नाही. पेस्टो हा जानेवारी महिन्यात जन्माला आला होता आणि त्याची भूक अत्यंत अधिक आहे. एका दिवसात तो किमान 25 मासे खात असतो असे अॅक्वेरियममधील पर्यवेक्षक जॅसिंटा अर्ली यांनी सांगितले आहे.
पेस्टोच्या व्हिडिओला जगभरात कोट्यावधी ह्यूज मिळाल्या आहेत. त्याला अत्यंत जाड परंतु प्रेमळ ठरविण्यात येत आहे. गायिका कॅटी पेरी देखील पेस्टोच्या चाहत्यांमध्ये सामील आहे. केटीने अलिकडेच या पेंग्विनची भेट घेतली असून तिच्या या व्हिडिओला 4 दशलक्ष ह्यूज मिळाल्या आहेत.