For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : गाईवरील प्रेमाचा अनोखा नमुना ! शलाकाचे डोहाळे जेवण गावात चर्चेचा विषय

01:03 PM Nov 19, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur news   गाईवरील प्रेमाचा अनोखा नमुना   शलाकाचे डोहाळे जेवण गावात चर्चेचा विषय
Advertisement

                       गायीचे डोहाळे जेवण! अंबप गावातील आगळावेगळा सोहळा चर्चेत

Advertisement

by किशोर जासूद

अंबप : कुणी तरी येणार येणार गं’ म्हणत डोहाळे जेवण भरवले जात असते. पण जर हेच डोहाळे जेवण एखाद्या गायीचे असेल तर..! हातकणंगले तालुक्यातील अंबप येथील विलास दाभाडे यांच्या कुटुंबाने आपल्या लाडाच्या गायीचे मोठ्या थाटामाटात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला. त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. कुणावर किती प्रेम असेल, तसे सांगणे अवघड आहे. कारण हातकणंगले तालुक्यातील अंबप येथील एका गाय प्रेमीने आपल्या गाईचे चक्क डोहाळे जेवण घातले. हे डोहाळे जेवण काही साधं-सुधा नव्हतं. तर अगदी झकास होते. गाईला सजवण्यापासून मेजवानीसाठी पंचपक्वान्नांचा रेलचेल, आहेर-माहेर असे सर्व काही करण्यात आले. हा सोहळा अगदी एखाद्या सुवासिनीच्या ओटीभरणीपेक्षाही दिमाखदार होता.

Advertisement

हातकणंगले तालुक्यातीलअंबप गावचे सामान्य शेतकरी विलास दाभाडे यांची गोमाता गोमाता पहिल्यांदा गाबन राहिली तिचा सातवा महिना असल्याने विलास दाभाडे ,रेखा दाभाडे व कुटुंबातील सर्वांनी ठरवले की आपण गोमातेचे ओटी भरणे (ढवाळ जेवन) घालू आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी गल्लीतील सुहासिनी महिलांना बोलावून ओठी भरण्याचा कार्यक्रम केला. मिस्ट अन्नाचे पोटभर जेवण दिले. दाभाडे हे कुटूंब बिगरशेतीचे आहे दुसर्‍याची शेती करुण गुजरान करत आहेत, हि गाय सहा महिन्यांची असताना अंबप गावातील सुनील पाटील यांच्याकडून हे वासरु आणले होते. पशुप्रेमी, मायाळू स्वभावाच्या विलास दाभाडे ,रेखा दाभाडे यांनी या गोंडस वासराला घरात घेऊन पोटच्या गोळ्यप्रमाणे संभाळले.

तीचे शलाका असे नाव ठेवले.

गर्भवती महिलेच्या पोटातल्या बाळावर गर्भसंस्कार पार पडावेत. म्हणून गर्भवती महिलांची ओटी भरणे अर्थात डोहाळे जेवण कार्यक्रम आयोजित करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. आता ही प्रथा प्राण्यांच्या बाबतीत अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. पण हातकणंगले तालुक्यातील अंबप येथे पार पडलेले, एका गायीचे डोहाळे जेवण सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला आहे. कारण एखाद्या सुवासिनीचा डोहाळे जेवणाला लाजवेल अशा थाटात गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पाडला. दाभाडे कुटुंबाचे त्यांच्याकडे असणार्‍यांनी शलाका गाईवर चे जीवापाड प्रेम आहे. विलास दाभाडे ,रेखा दाभाडे यांचे गायीवर खुप प्रेम आहे.

अगदी तिच्या आंघोळीपासून सर्व गोष्टींची काळजी दाभाडे कुटुंब स्वतः घेतात. गाईवर नितांत प्रेम असणार्‍या विलास दाभाडे यांच्या गाईला सध्या दिवस गेले असून सातवा महिना सुरू आहे. महिलांची जशी ओटी भरणी होते. त्यापध्दतीने विलास दाभाडे आणि त्यांच्या कुटुंबांनी आपल्या गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा बेत आखला.

त्यासाठी कपिला आली आमच्या घरी ढोहाळे पुरवावे माझे असे कार्यक्रमाचे नाव देऊन मित्र परिवार व आप्तेष्टांना निमंत्रण धाडले. पंचपक्वान्न आणि आहेर-माहेर… अगदी त्यांनी आपल्या गाईला या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमानिमित्ताने छान सजवले. शिंग्या शेंब्या, पासूनपायापर्यंत फुलांच्यापासून तिच्या अंगावर मखमली झुला, साड्या, कंकण अशा पध्दतीचे वेशभूषा करण्यात आली. उपस्थितांना जेवन, गाईचे औक्षण आणि सर्व विधी देखील अगदी दिमाखात पार पडले. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात गल्लीतील महिलांची उपस्थिती होती. खरं तर असं म्हणतात की हौसेला मोल नसते. विलास दाभाडे व त्यांच्या पत्नी रेखा दाभाडे व त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या लाडक्या गायीच्या डोहाळ जेवणाच्या निमित्ताने केलेला कार्यक्रम त्याचे उदाहरण म्हणावे लागेल.

Advertisement
Tags :

.