महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जुना वीजखांब फोडून लोखंड पळविण्याचा प्रकार

06:25 AM Aug 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हिंदवाडीतील घटना मोबाईलमध्ये कैद

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

रस्त्याशेजारी फेकून देण्यात आलेले जुने वीजखांब फोडून दोघा जणांनी यामधील लोखंड पळविले आहे. शनिवारी सकाळी हिंदवाडी परिसरात ही घटना घडली असून, काही जणांनी तर हा लोखंड चोरीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आहे.

हिंदवाडी येथील लिंगायत स्मशानाजवळ शनिवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. स्मशानाजवळच जुने वीजखांब पडून होते. सायकलवरून आलेल्या दोघा जणांनी मोठ्या हातोड्याने खांब तोडून त्यामधील लोखंड पळविले आहे.

हे वीजखांब वापरातले होते की जुने याचा उलगडा झाला नाही. रस्त्याशेजारीच ते टाकून देण्यात आले होते. भरदिवसा खांब फोडून लोखंड पळविण्यात आले आहे. हा प्रकार लक्षात येताच काही जणांनी आपल्या मोबाईलमध्ये ते चित्रित केले. तरीही निवांतपणे खांब फोडून लोखंड पळविण्यात ते दोघे जण मग्न होते.

नव्या बांधकामावरील लोखंड पळविताना एका रिक्षाचालकाला रंगेहाथ पकडून त्याला चोप दिल्याची घटना ताजी असतानाच विजेचे खांब फोडून लोखंड पळविण्यात आले आहे. भरपावसातही त्या दोघा जणांनी निवांतपणे मोठ्या हातोडीने खांब फोडून लोखंड पळविले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#soical
Next Article