महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

किल्ल्यानजीक बसने ठोकरल्याने दुचाकीस्वार हॉटेलचालक ठार

06:02 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

भरधाव बसने दुचाकीला ठोकरल्याने हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी मध्यरात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास किल्ल्याजवळ हा अपघात घडला आहे. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

Advertisement

शिवकुमार मल्लिकार्जुन बिडीकर (वय 41) रा. मठ गल्ली असे त्या दुर्दैवी हॉटेलचालकाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. शिवकुमार जुना पी. बी. रोडवर हॉटेल चालवत होते. शुक्रवारी मध्यरात्री हॉटेल बंद करून एका कामगाराला घरी पोहोचवून परतत असताना ही घटना घडली आहे.

वास्कोहून बदामीला जाणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसची दुचाकीला धडक बसली. या अपघातात शिवकुमार जागीच ठार झाले. घटनेची माहिती समजताच वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article