महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तीन वाहनांच्या अपघातात दुचाकीचालक जागीच ठार

12:44 PM Jan 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कुठ्ठाळी-कोन्सुआ नाक्यावरील घटना : सिग्नल यंत्रणा आवश्यक

Advertisement

वार्ताहर /झुआरीनगर

Advertisement

वेर्णा वास्को महामार्गावरील कोन्सुआ नाक्यावर काल शुक्रवारी तीन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात दुचाकी चालक फ्रान्सिस डिसिल्वा (61 वर्षे) हे जागीच ठार झाले. हा अपघात सकाळी 10 वा.च्या सुमारास घडला. बेर्ले वेलसांव येथील फ्रान्सिस डिसिल्वा हे त्यांचा मुलगा एरॉन डिसिल्वा याच्यासोबत अॅक्टिवा दुचाकीने कोन्सुआ चर्चमध्ये रिट्रीटसाठी जात होते. यावेळी नाक्यावरून कोन्सुआच्या दिशेने जात असताना स्प्लेंडर दुचाकीची धडक त्यांच्या अॅक्टिवा दुचाकीला बसल्याने दोघेही पिता पुत्र रस्त्यावर कोसळले. याचवेळी मागावून त्याच दिशेने येणाऱ्या मालवाहू रिक्षाच्या खाली फ्रान्सिस आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मुलगा एरॉन जखमी झाला. त्याला त्वरित उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले. फ्रान्सिस डिसिल्वा यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे. या अपघातामुळे वेर्णाच्या दिशेने जाणारी वाहतूक काही वेळ खोळंबली होती. वेर्णा पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे.

कोन्सुआ नाक्यावर गतिरोधक, सिग्नल यंत्रणा उभारा!

अपघाताची माहिती मिळताच, कुठ्ठाळीचे आमदार अँथनी वास घटनास्थळी दाखल झाले. यावेळी उपस्थित कोन्सुआच्या नागरिकांनी या नाक्यावर गतिरोधक किंवा सिग्नल यंत्रणा उभारण्याची मागणी केली. मागील काही वर्षात कोन्सुआ नाक्यावर अनेक छोटे मोठे अपघात घडून अनेकांनी आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. या नाक्यावर नावता तसेच कोन्सुआ गावातील रस्ते जोडलेले आहेत. त्यामुळे या अंतर्गत रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या गाड्यांना महामार्गावरून सुसाट वेगाने धावणाऱ्या गाड्यांमुळे हा मार्ग धोकादायक बनला आहे. दाबोळी ते वेर्णा दरम्यान असे सात नाके असून प्रत्येक नाक्यावर अनेकवेळा अपघाताच्या घटना घडतात.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article