महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाचही राज्यांमध्ये रस्सीखेच अपेक्षित

06:44 AM Dec 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एक्झिट पोल अंदाज जाहीर : राजस्थानमध्ये भाजपची आघाडी : छत्तीसगड, तेलंगणात काँग्रेसला अधिक पसंती;

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी तेलंगणात गुऊवारी मतदान संपल्यानंतर पाच राज्यातील स्थितीविषयी एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहेत. निकालापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या या अंदाजानुसार छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात रस्सीखेच निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. तर तेलंगणा बीआरएस आणि काँग्रेस यांच्यात चढाओढ निर्माण होऊ शकते. तसेच मिझोरामध्ये सत्ताधारी एमएनएफ आणि झोराम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) यांच्यात सत्तास्थापनेसाठी राजकीय स्पर्धा निर्माण होण्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.

एक्झिट पोल आयोजित करणाऱ्या विविध एजन्सींनी सर्व राज्यांसाठी आपापले अंदाज जारी केले आहेत. अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये 16,270 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. येथील पाहणी अहवाल धक्कादायक आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या 90 जागा आहेत. अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे. येथे काँग्रेसला 40 ते 50 जागा मिळतील असे म्हटले आहे. त्याचवेळी भाजपला 36 ते 46 जागा देण्यात आल्या आहेत. येथे काँग्रेसला आघाडी मिळाली असली तरी, भाजपला मिळालेल्या जागांशी तुलना केल्यास ही लढत एकतर्फी मानता येणार नाही. काँग्रेसने मिळवलेल्या जागांच्या तुलनेत भाजपही मागे नाही. या दोघांमध्ये निकराची स्पर्धा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. राज्यात भूपेश बघेल सरकारच्या विरोधात सत्ताविरोधी लाट नसल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. सर्वेक्षणात 31 टक्के लोकांनी विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आपली पसंती असल्याचे घोषित केले आहे. त्याचवेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांना केवळ 21 टक्के मते मिळाली.

एबीपी सी-व्होटर एक्झिट पोल 2023 च्या निकालानुसार, छत्तीसगडच्या दक्षिण भागात काँग्रेसला आघाडी मिळत असल्याचे दिसते. छत्तीसगडच्या दक्षिण भागातील 12 जागांपैकी भाजपला 3-7, काँग्रेसला 5-9 आणि इतरांना एक जागा मिळण्याची शक्मयता आहे. दक्षिण विभागात एकूण 12 जागा आहेत. येथे भाजपची मतांची टक्केवारी 43 टक्के, काँग्रेसची 43 टक्के आणि इतर पक्षांची मतांची टक्केवारी 14 टक्के आहे.

राजस्थान : वेगवेगळे अंदाज

राजस्थानमध्ये विधानसभेच्या 199 जागांसाठी मतदान झाले आहे. अॅक्सिस माय इंडियाच्या अंदाजानुसार काँग्रेसला 86 ते 106 जागा आणि भाजपला 80-100 जागा देण्यात आल्या आहेत. राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. मतदारांनी 75.45 टक्के मतदान केले होते. ‘जन की बात’ एक्झिट पोलनुसार भाजपला 100 ते 122 जागांसह स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तर काँग्रेसला केवळ 62 ते 85 जागा मिळू शकतात. इतरांना 15 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार अशोक गेहलोत यांना खुर्ची गमवावी लागू शकते.

मध्यप्रदेशात भाजपचे सरकार?

मध्यप्रदेशात रिपब्लिक टीव्ही-मॅट्रीजच्या अंदाजानुसार भाजपला बहुमत मिळणार आहे. भाजप येथे 118-130 जागा जिंकू शकतो, तर काँग्रेसला केवळ 97-107 जागांवर समाधान मानावे लागेल. या दोन पक्षांव्यतिरिक्त मध्यप्रदेशात बसपाला 0 आणि इतरांना 0-2 जागा मिळण्याची शक्मयता आहे. मध्यप्रदेशातील सर्व 230 विधानसभा जागांसाठी 17 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झाले होते. सध्या राज्यात दिग्गज राजकारणी शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. येथे अत्यंत आत्मविश्वासाने राबविलेल्या प्रचारादरम्यान आपल्या सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा गाजावाजा करून जनतेच्या पाठिंब्याचा दावा करत राहिले.

तेलंगणात ‘राव’ की बदलणार ‘राज’?

तेलंगणामध्ये गुऊवारी मतदान झाल्यानंतर एकूण 2,290 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील झाले आहे. राज्यात बीआरएसच्या सत्तेला काँग्रेस आव्हान देईल, असा अंदाज ‘जन की बात’ने बांधला आहे. येथे काँग्रेसला 48-64 जागा मिळू शकतात. तर केसीआर यांच्या पक्षाला 40-45 जागा मिळू शकतात. भाजपला 7-13 तर इतरांना 4-7 जागा मिळू शकतात. इंडिया टीव्ही-सीएनएक्सनुसार काँग्रेसला येथे 63-79 जागा मिळू शकतात. तर बीआरएसला 31-47 जागा मिळू शकतात. भाजपला 2-4 तर इतरांना 5-7 जागा मिळू शकतात. येथील विधानसभेच्या 119 जागांपैकी 19 अनुसूचित जाती आणि 12 अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. निवडणुका संपल्यानंतर विविध एजन्सीचे एक्झटि पोल प्रसिद्ध झाले आहेत.

मिझोराम : ‘माजी आयपीएस’चा जोरदार संघर्ष

ईशान्येकडील राज्य मिझोरामचाही निवडणूक राज्यांमध्ये समावेश आहे. येथील 40 विधानसभा मतदारसंघांसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. येथे माजी आयपीएस लालदुहोमा यांचा पक्ष झोराम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. ‘जन की बात’च्या एक्झिट पोलमध्ये 15-25 जागा मिळताना दिसत आहेत. तर सत्ताधारी एमएनएफला 10-14 जागा दाखविण्यात आल्या आहेत. काँग्रेसला 5-9 जागा मिळू शकतात. याशिवाय भाजपला 0-2 जागा मिळू शकतात. इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या एक्झिट पोलमध्ये झेडपीएमला 12-16 जागा मिळाल्या आहेत. तर सत्ताधारी एमएनएफला 14-18 जागा दाखविण्यात आल्या आहेत. काँग्रेसला 8-10 जागा मिळू शकतात. याशिवाय भाजपला 0-2 जागा मिळू शकतात. एबीपी-सी मतदारांच्या अंदाजानुसार, झेडपीएमला 15-25 जागा मिळताना दिसत आहेत. तर सत्ताधारी एमएनएफला 15-21 जागा दाखविण्यात आल्या आहेत. काँग्रेसला 2-8 जागा मिळू शकतात. याशिवाय 0-5 जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात. टाइम्स नाऊ-ईटीजीच्या एक्झीट पोलनुसार, जेपीएमला 10-14 जागा मिळताना दिसत आहेत. एमएनएफला 14-18 जागा दाखवल्या आहेत. काँग्रेसला 14-18 जागा मिळू शकतात. भाजपला 0-2 जागा मिळतील. याशिवाय 0-1 जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात.

 

सर्वेक्षण संस्था            काँग्रेस            भाजप            अन्य

आजतक एक्सिस माय इंडिया    86-106           80-100            9-18

जन की बात               62-85            100-122          14-15

टीव्ही 9पोलस्ट्रैट                   90-100            100-110           5-15

टाईम्स नाऊ ईटीजी                56-72            108-128          13-21

पी मार्क रिपब्लिक                 69-91            105-125          5-15

इंडिया टीव्ही सीएनएक्स  94-104           80-90             14-18

 

2018 चा निकाल          काँग्रेस-100   भाजपा-73   बसप-06  अन्य-08  अपक्ष- 13

.......................................................................................................................................................................................................

 

मध्यप्रदेश        एकूण जागा - 230        बहुमत -116

सर्वेक्षण संस्था                          भाजप            काँग्रेस            अन्य

रिपब्लिक टीव्ही-मॅट्रीज           118-103          97-107           0-2

जन की बात                         100-123          102-125          0-5

टीव्ही 9- पौलस्ट्रैट                 106-116          111-121          0-6

न्यूज 24-टुडेज चाणक्य                  151               74               5

 

2018 चा निकाल     काँग्रेस-114   भाजपा- 109    बसपा-02           सपा-01           अपक्ष-04

.......................................................................................................................................................................................................

 

छत्तीसगड                              एकूण जागा - 90         बहुमत - 46

सर्वेक्षण संस्था                                काँग्रेस            भाजप            अन्य

आज तक एक्सिस माय इंडिया             40-50             36-46            1-5

एबीपी सी वोटर                                 41-53             36-48            0-4

न्यूज 24 टुडेज चाणक्य                          57               33  0

इंडिया टीव्ही सीएनएक्स                    46-56            30-40             3-5

जन की बात                                     42-53            34-45            3

रिपब्लिक टीव्ही-मॅट्रीज                     44-52            34-42            0-2

टीव्ही 9 पोलस्ट्रैट                            40-50             35-45            0-3

टाईम्स नाऊ ईटीजी                         48-56            32-40             2-4

2018 - चा निकाल    काँग्रेस-68    भाजपा-15   जेसीसी-05            बसपा-02

.......................................................................................................................................................................................................

तेलंगणा          एकूण जागा -   119 : बहुमत  - 60

सर्वेक्षण संस्था            बीआरएस                  काँग्रेस            भाजप            एआयएमआयएम

जन की बात                          40-55            48-46            7-13               4-7

न्यूज 23 टुडे चाणक्य              33                 71                  7                    0

रिपब्लिक टीव्ही-मॅट्रीज           46-56            58-68            4-9                5-7

टीव्ही 9 पोलस्ट्रैट                  48-58            49-59            5-10               6-8

.......................................................................................................................................................................................................

 

मिझोराम        एकूण जागा- 40 बहुमत -21

सर्वेक्षण संस्था                       एमएनएफ       झेडपीएम            काँग्रेस           भाजपा

इंडिया टीव्ही सीएनक्स            14-18             12-16             8-10              0-2

जन की बात                           10-14             15-25            5-9               0-2

रिपब्लिक टीव्ही मॅट्रीज            17-22            7-12              7-10              0-2

टाईम्स नाऊ ईटीजी                14-18             10-14             9-13              0-2

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article