For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News : पवनचक्कीचे पाते वाहतूक करणारा ट्रक रस्त्यावर अडकला

05:07 PM Dec 05, 2025 IST | NEETA POTDAR
solapur news   पवनचक्कीचे पाते वाहतूक करणारा ट्रक रस्त्यावर अडकला
Advertisement

            वाशी तालुक्यात पवनचक्कीची मनमानी ; शेतकऱ्यांना होणारा त्रास

Advertisement

वाशी : वाशी तालुक्यातील हायवे रस्त्यावर भर दिवसा म्हणजेच दीड वाजता पवनचक्कीचे पाते वाहतूक करणारा मोठा ट्रक रोडवर क्रॉसिंग करत असताना अडकला. यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली, पवनचक्कीला शासकीय नियमानुसार संध्याकाळी नऊच्या पुढे व सकाळी सहा वाजेपर्यंत वाहतूक करण्यास परवानगी दिलेली असून त्याची पायमल्ली करून भर दिवसा वाहतूक चालू आहे.

वाशी तालुक्यात पवनचक्कीची मनमानी व शेतकऱ्यांना होणारा त्रास हा चव्हाट्यावर विषय आला असून याकडे कोणाचेही लक्ष नाही. कायदा व सुव्यवस्था तसेच शासकीय नियम यांच्या पुढेहतबल झाले की काय असा मोठा प्रश्न दिसून येत आहे.दिवसा न वाहतूक करणे हा शासकीय नियम असून हा नियम धाब्यावर बसविण्याचे काम पवनचक्कीवाले सध्या करीत आहेत.

Advertisement

याचा प्रत्यय वाशी तालुक्यातील वायरलेस ह्या क्रॉसिंग सेंटरला आज दुपारी दीड वाजता दिसून आला. भले मोठे पाते घेऊन जाणारा ट्रक टर्न घेत असताना रोडवरच आडवा उभा राहिला त्यामुळे हायवे क्रमांक ५२ एक तास दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प राहिली.

Advertisement
Tags :

.