For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अलारवाड ब्रिजजवळ ट्रकचालकाला चाकूच्या धाकाने लुटले

11:13 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
अलारवाड ब्रिजजवळ ट्रकचालकाला चाकूच्या धाकाने लुटले
Advertisement

तिघा अज्ञातांविरुद्ध एफआयआर

Advertisement

बेळगाव : चाकूचा धाक दाखवून आयशर चालकाची लूट करण्यात आली आहे. बुधवारी मध्यरात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील अलारवाड ब्रिजजवळ ही घटना घडली आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. दीपक नागाप्पा संजीवगोळ (वय 36) रा. बडकुंद्री, ता. हुक्केरी हे एमएच 12, एचडी 2256 क्रमांकाची आयशर ट्रक उभी करून लघुशंकेला गेले होते. ते पुन्हा आपल्या ट्रकमध्ये चढले, त्यावेळी एका अज्ञाताने ‘पाणी दे दो’ असे म्हणत पाणी मागितले. त्याला पाण्याची गरज असणार असा विचार करत असतानाच त्याने त्यांच्या पोटावर चाकू रोखला. एकूण तिघे जण तेथे होते. आणखी एकाने गळ्यावर चाकू ठेवून दीपक यांच्या खिशातील मोबाईल संच, साडेचार हजार रुपये रोकड, एटीएम कार्ड हिसकावून घेतले. त्यानंतर काळ्या रंगाच्या अॅक्टिव्हावरून हे गुन्हेगार येडियुराप्पा मार्गच्या दिशेने निघून गेले. दीपक हे स्वत:च आयशर ट्रकचे चालक आणि मालक आहेत. लूटमारीची घटना हिरेबागेवाडी पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक गुरुशांत दाशाळ व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.तिघा अज्ञातांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.