महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पावसामुळे बहाद्दरवाडी क्रॉस येथे झाड कोसळले

10:28 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /किणये

Advertisement

तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस झाला. या वादळी वाऱ्यामुळे बहाद्दरवाडी क्रॉस येथे एक झाड कोसळले. सदर झाड हे एका चहाच्या टपरीवर कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळाच्या पावसामुळे पाथर्डी क्रॉस येथे एका चहाच्या टपरीवर झाड कोसळले. त्यामुळे सदर टपरी मालकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. किणये, संतिबस्तवाड, बेळवट्टी, इनाम बडस, बाकनूर येथे गुऊवारी जोरदार पाऊस झाला. यामुळे नदी-नाल्यांमध्ये पाणी आले होते. तसेच शिवारामध्ये पाणी साचले होते. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. बऱ्याच ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटुन पडल्या होत्या. तसेच विद्युतखांबही मोडून पडले होते. यामुळे गुऊवारी सायंकाळपासून शुक्रवारी दुपारपर्यंत या भागातील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. विद्युतपुरवठाही खंडित झाला होता.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article