For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नीरज चोप्रासमोर आज कठीण आव्हान

06:55 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
नीरज चोप्रासमोर आज कठीण आव्हान
Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

गतविजेता नीरज चोप्रा येथे आज गुरुवारी पॅरिस ऑलिम्पिकच्या पुऊष भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत इतिहासाचा आणखी एक अध्याय नोंदवू पाहणार आहे. पात्रता फेरीत 89.34 मीटरची अप्रतिम भालाफेक केलेली असली, तरी त्याच्यासमोर कठीण आव्हान आहे.

तीन वर्षांपूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने ज्या प्रकारे कामगिरी केली त्याचप्रमाणे चोप्राला त्याच्या सुऊवातीच्या थ्रोसह पात्रता फेरीत अव्वल होण्यासाठी अवघे काही सेकंद लागले. परंतु दोन ऑलिम्पिकमधील स्थितीची समानता तिथेच संपते. यावेळी स्पर्धेची तीव्रता टोकियोपेक्षा जास्त आहे आणि नऊ भालाफेकपटूंनी पॅरिसमध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याकरिता निर्धारित केलेली 84 मीटर्सची मर्यादा पार केलेली आहे. टोकियोमध्ये सहा भालाफेकपटूंना ते जमले होते.

Advertisement

यावेळच्या पात्र ठरलेल्या नऊ भालाफेकपटूंपैकी पाच जणांनी त्यांच्या पहिल्या थ्रोसह अंतिम फेरीत प्रवेश केला आहे आणि त्यामुळे पदकप्राप्तीसाठी तीव्र स्पर्धा असेल हे स्पष्ट आहे. 26 वर्षीय चोप्राला हे चांगलेच माहीत आहे. कारण तो आठ वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. ‘फायनलमध्ये प्रत्येकाची मानसिकता आणि परिस्थिती वेगळी असते. ही एक चांगली स्पर्धा ठरेल. जो आपोआप पात्र ठरतो त्याची तयारी सर्वोत्कृष्ट असते’, असे नीरजने पत्रकारांना सांगितले.

चोप्राला ऑलिम्पिक भालाफेक इतिहासात जेतेपद राखणारा केवळ पाचवा खेळाडू बनण्याची संधी असेल. जर त्याने सुवर्णपदक जिंकले वा एखादे पदक जरी जिंकले, तरी तो वैयक्तिक खेळांतील ऑलिम्पिकमधील सर्वांत यशस्वी भारतीय खेळाडू ठरेल. बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू (एक रौप्य, एक कांस्य), कुस्तीपटू सुशील कुमार (एक रौप्य, एक कांस्य) आणि नेमबाज मनू भाखर (दोन कांस्य) यांनी स्वातंत्र्यानंतर प्रत्येकी दोन ऑलिम्पिक पदके जिंकलेली आहेत.

नीरज चोप्राची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 2022 मध्ये 89.94 मीटर्स अशी नोंदली गेली. पण पात्रता फेरीतील त्याच्या 89.34 मीटर्स थ्रोमुळे लाखो भारतीय चाहत्यांच्या आशा वाढलेल्या आहेत. आज गुऊवारी त्याने 90 मीटरचा टप्पा ओलांडताना पाहायला मिळावे, अशीच सर्वांची अपेक्षा असेल.

Advertisement
Tags :

.