अबब11 हजार 991 मतदारांनी उमेदवारांना नाकारले
विधानसभेच्या तीन निवडणुकांमध्ये 40 हजार मतदारांचा नोटावरशिक्का,
‘उत्तर’मध्ये सर्वांधिक 6700 नोटाला मते
उमेदवारांसह नेत्यांवर आत्मचिंतनाची वेळ
कोल्हापूर/ विनोद सावंत
विधानसभा २०१४.२०१९ आणि २०२४च्या निवडणुकांमध्ये 40 हजार 168 मतदारांनी उमेदवारांना नाकारत नोटावर शिक्का मारला आहे. विशेष म्हणजेच 15 हून अधिक उमेदवारअसतानाही नोटाला मतदान झाले आहे. यंदाच्यानिवडणुकीत 11 हजार 991 मतदारांनी नोटाला पसंतीदर्शवली आहे. 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेतयावेळी 3 हजार 29 मतांची घट झाली असली तरीनोटाला होणारे मतदानामुळे उमेदवारांसह नेत्यांवरआत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
उमेदवारपसंतीचा नसल्याने मतदार निवडणुकीकडे पाठफिरवतात. यामुळेच मतदानाचा टक्का घटतो.मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, यासाठीनिवडणूक आयोग नेहमीच प्रयत्न करत आहे.यामुळेच 2014 पासून निवडणूक आयोगाने नोटा(यापैकी कोणतेच नाही) हा पर्याय दिला आहे.मतदारांकडूनही नोटाचा वापर होत असल्याचे गेल्याकाही निवडणूकांमध्ये दिसून आले आहे.
विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकांपासून बॅलेट पेपरवर नोटा हा पर्याय आला. यावेळी 10 मतदार संघात 13 हजार 157 मतदारांनी नोटाला मतदान केले. यानंतर झालेल्या 2019 च्या निवडणूकीत 15 हजार 20 मतदारांनी नोटालामतदान दिले. 2024 च्या निवडणुकीमध्ये 11 हजार 991 मतदारांनी नोटावर शिक्का मारला आहे. गत दोन निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण काही अंशीघटले आहे. असे असले तरी 15 हून अधिक उमेदवारअसतानाही तीन निवडणुकांमध्ये नोटाला 40 हजार 166मतदारांनी मतदान केले आहे. यंदाच्यानिवडणुकीमध्ये दोन मतदार संघामध्ये दुसऱ्याक्रमांकांची मते नोटाला झालेली आहेत. तरकाही मतदार संघात अपेक्षा पेक्षाही नोटाला अधिकमते आहेत.
उत्तरमध्ये सर्वाधिक "नोटा"
विधानसभेच्या 2014, 2019 आणि 2024 अशा तीन निवडणुकामध्ये मिळून 40 हजारांवर नोटला मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक उत्तरमध्ये 6700 मतदारांनी नोटाला मतदान केले आहे. तर करवीरमध्ये सर्वात कमी2751 तर कागलमध्ये 2899 इतक्या मतदारांनी नोटावर शिक्का मारला आहे.
म्हणूनच नोटाकडे कल वाढतोय...
नेते राजकीय हित डोळ्यासमोर ठेवून उमेदवाराची निवडकरतात. काही उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतात. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डावलून घराणेशाहीचा अवलंब केला जातो. त्यांनी असेदिलेला उमेदवार मतदारांच्या पचनी पडेलच याचीशाश्वती नाही. त्यामुळेच नोटाकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.
विधानसभेच्या तीन निवडणुकीतील नोटाला मिळालेली मते
मतदारसंघ 2014 2019 2024
चंदगड 1189 1793 979
राधानगरी 1343 1656 996
कागल 850 1163 886
दक्षिण 2102 1939 1661
करवीर 789 1284 678
उत्तर 1372 3039 2289
शाहूवाडी 1024 942 574
हातकणंगले 1690 2367 1152
इचलकरंजी 1507 1513 1487
शिरोळ 1291 1287 1289
एकूण 13157 15020 11991