दफनभूमीत मिळाला मकबरा,
3800 वर्षे जुना खजिना गवसला
खोदकामात अनेकदा अनपेक्षित गोष्टी हाती लागत असतात. इजिप्तमध्ये असेच घडले आहे. तेथील दफनभूमीत खोदकाम सुरू असताना पुरातत्व तज्ञांना एक मकबरा आढळून आला. परंतु त्यात सापडलेल्या गोष्टी पाहून सर्वजण अवाक् झाले आहेत.
दक्षिण असाफिक दफनभूमीत उत्खनन करणाऱ्या पथकाला 11 व्यक्तींचे अवशेष मिळाले आहेत. यात 5 महिला, दोन पुरुष आणि तीन मुलांचा समावेश आहे. यातील एकाची ओळख पटलेली नाही. पुरातत्वतज्ञांनी अधिक तपासणी केली असता हे अवशेष ख्रिस्तपूर्व 1981 ते 1802 काळातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मृतांना मूळ स्वरुपात लिननमध्ये गुंडाळण्यात आले होते आणि लाकडाच्या पेटीत दफन करण्यात आले होते. यानंतर तेथे मोठा पूर आल्याने अवशेषांना नुकसान पोहोचले होते. परिवाराच्या अवशेषांना नुकसान पोहोचले. या क्षेत्रात आढळून आलेला हा मध्ययुगातील पहिला मकबरा असल्याचे साउथ असाफिक कंजर्व्हेशन प्रोजेक्टच्या प्रमुखांनी सांगितले आहे.
या मकबऱ्यात मानवी अवशेषांसोबत खजिनाही मिळाला असून यात हार, कंकण, स्कारब रिंग समवेत अनेक दागिने सामील आहेत. दोन दफनभूमींमधून तांब्याच्या मिश्र धातूने निर्मित काच मिळाली असून त्यावर हस्तिदंताची मूठ लावलेली होती. यातील एका मूठीवर चार मुखीचा हत्ती कोरण्यात आला होता, जो इजिप्तचय देवीशी संबंधित होता. तसेच मोत्यांचा हारही तेथे सापडला आहे. सिरॅमिकची एक मूर्तीही तेथे सापडली असून त्याचे पाय तोडलेले होते आणि याला हिऱ्यांनी सजविण्यात आले होते. मूर्तीच्या शिरावर छिद्र असून केसांना मोत्यांमध्ये गुंफण्यात आले होते.