कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुंबई-गुजरातदरम्यान आज चुरशीचा मुकाबला

06:55 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई/ वृत्तसंस्था

Advertisement

इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीन पारडे भक्कम असलेल्या दोन संघांमध्ये आज मंगळवारी सामना होणार असून त्यात गुजरात टायटन्सच्या वरच्या फळीला मुंबई इंडियन्सच्या शक्तिशाली माऱ्याविरुद्ध कठोर परीक्षेला तोंड द्यावे लागणार आहे.

Advertisement

सर्व संघांमध्ये सर्वोत्तम नेट रन रेटसह तिसऱ्या स्थानावर असलेल्या मुंबईला अंतिम चारमध्ये थेट स्थान निश्चित करण्यासाठी उर्वरित तीन सामन्यांपैकी दोन जिंकण्याची आवश्यकता आहे. पाच वेळा विजेतेपद मिळविणारा मुंबईचा संघ यापैकी दोन सामने घरच्या मैदानावर खेळेल, जिथे त्यांनी पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. चौथ्या क्रमांकावर असलेल्या गुजरातचे चार सामने शिल्लक आहेत, ज्यापैकी दोन अहमदाबादमधील त्यांच्या घरच्या मैदानावर होतील. तिथे त्यांनी पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आणखी दोन विजयांची आवश्यकता आहे. त्यांच्या बी. साई सुदर्शन (504 धावा), जोस बटलर (470) आणि कर्णधार गिल (465) या वरच्या फळीतील त्रिकुटाने या स्पर्धेत इतर कोणत्याही संघापेक्षा जास्त वर्चस्व गाजवले आहे आणि टायटन्सला अनेक विजय मिळवून दिले आहेत.

परंतु आज ते या स्पर्धेतल्या सर्वोत्तम माऱ्याविरुद्ध कशी कामगिरी करतात ते पाहावे लागेल. ट्रेंट बोल्ट (16 बळी), हार्दिक पंड्या (13), जसप्रीत बुमराह (11) आणि दीपक चहर (9) यांनी विरोधी फलंदाजांसाठी कठीण काळ निर्माण केला आहे. मुंबईने त्यांच्या विजयांच्या मालिकेला सुऊवात केल्यापासून एकदाही घरच्या मैदानावर किंवा दूरस्थ ठिकाणी 200 पेक्षा जास्त धावा दिलेल्या नाहीत. टायटन्सच्या छावणीत धोक्याची घंटा वाजवण्यासाठी हे पुरेसे आहे. त्यांच्या विजयाचा फॉर्म्युला प्रामुख्याने प्रथम फलंदाजी करताना मोठ्या धावसंख्येचा ढीग रचण्यावर आधारित आहे.

परंतु मुंबईला टायटन्सच्या आणखी एका कामगिरीपासून सावध राहावे लागेल. गुजरातने लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांचे तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले आहेत. गुजरातच्या वरच्या फळीतील तीन फलंदाजांनी वर्चस्व गाजवले असले तरी, शेरफेन रदरफोर्ड (201 धावा) वगळता इतरांना स्वत:स सिद्ध करण्याच्या दृष्टीने जास्त वेळ मिळालेला नाही. मुंबईचा विचार करता या स्पर्धेत इतर कोणताही अष्टपैलू खेळाडू त्याच्याइतकी प्रशंसनीय कामगिरी (157 धावा, 13 बळी) करू शकले नाही. त्याशिवाय सूर्यकुमार यादव (475) फॉर्मात आलेला असून ही प्र्तिसपर्ध्यांसाठी खरोखरच मोठी चिंताजनक बाब आहे. रायन रिकल्टनने (334) उशिरा प्रभाव पाडून रोहितवरील दबाव कमी केला आहे. विल जॅक्स देखील अष्टपैलू खेळाडू म्हणून फॉर्मात येत असून तिलक वर्मा (239) आणि नमन धीर (155) हेही संघाला मजबुती देत आहेत.

गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी कागिसो रबाडाच्या अनुपस्थितीतही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. प्रसिद्ध कृष्णा 19 बळींसह अव्वल स्थानावर आहे. मोहम्मद सिराज (14) आणि आर. साई किशोर (12) यांनीही सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. तात्पुरती निलंबनाची शिक्षा भोगून रबाडा परत आला आहे. पण तो आगामी सामने खेळू शकेल की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. कारण त्याच्या निलंबनाचा कालावधी अद्याप माहित नाही.

संघ-मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिन्झ, रायन रिकल्टन, श्रीजीथ कृष्णन, बेव्हन जेकब्स, तिलक वर्मा, नमन धीर, विल जॅक्स, मिशेल सँटनर, राज अंगद बावा, रघू शर्मा, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, दीपक चाहर, अश्वनी कुमार, रीस टोपली, व्ही. एस. पेनमेत्सा, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, जसप्रीत बुमराह.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, शेरफेन रदरफोर्ड, निशांत सिद्धू, महिपाल लोमरोर, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद अर्शद खान, आर साई किशोर, जयंत यादव, करिम जनात, बी. साई सुदर्शन, दासून शनाका, शाहऊख खान, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुथार, जेराल्ड कोएत्झी, गुरनूर सिंग ब्रार, इशांत शर्मा, कुलवंत खेजरोलिया, राहुल तेवतिया, रशिद खान.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article