महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खेड्यात घुसला वाघ, ग्रामस्थांची पळापळ

06:08 AM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

► वृत्तसंस्था / अथकोना

Advertisement

उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्याच्या अथकोना या खेड्यात एका वाघाने चांगलीच धमाल उडवून दिल्याची घटना घडली आहे. हा वाघ पिलीभीतच्या व्याघ्र संरक्षण प्रकल्पातील आहे. मंगळवारी सकाळी त्याने या खेड्यात प्रवेश केला. त्यावेळी तो जखमी अवस्थेत असल्याचे दिसत होते. त्याने एका घराच्या भिंतीवर उडी घेतली आणि तेथेच ठाण मांडले. वाघाला बघून घरातील लोकांची भीतीने गाळण उडाली. त्यांनी त्वरित पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

Advertisement

गावात हे वृत्त पसरताच ग्रामस्थांची प्रारंभी चांगलीच पळापळ झाली. मार्ग ओस पडले. हा पूर्ण वाढ झालेला वाघ या भिंतीवर बराच काळ विश्रांती घेत होता. हळूहळू ग्रामस्थांची भीती चेपल्यानंतर ते या वाघाच्या दर्शनासाठी गर्दी करु लागले. नजीकच्या गावांहूनही लोक येथे वाघ पाहण्यासाठी आल्याने वाघाच्या भोवती काही अंतर सोडून बरीच गर्दी झाली होती. त्यानंतर काही वनाधिकारी येथे आले. त्यांनी वाघाला चुचकारण्याचा दुरुन प्रयत्न केला. पण वाघ जागेवरुन उठावयास तयार नव्हता. अखेर बऱ्याच वेळानंतर त्याने त्या भिंतीवरुन खाली उडी घेतली आणि मार्गावरुन चालण्यास प्रारंभ केला. त्यावेळी वनाधिकाऱ्यांसमवेत आलेल्या पशुतज्ञांनी त्याच्यावर दुरुन डार्ट सोडला. त्यानंतर वाघ बेशुद्ध पडला. नंतर त्याला पशुरुग्णालयात नेण्यात आले आणि ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

संरक्षणासाठी जाळी

वाघ भिंतीवर विश्रांती घेत होता, तेव्हा वनाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी भिंतीभोवती सुरक्षित अंतर राखून नॉयलॉनचे जाळे उभे केले होते. वाघ आक्रमक झाल्यास ग्रामस्थांचे संरक्षण व्हावे, यासाठी ही सोय करण्यात आली होती. तथापि, हा वाघ भुकेलेला नव्हता. त्यामुळे त्याने कोणावरही हल्ला केला नाही. तो जखमी असल्याने कदाचित विश्रांती घेण्यासाठी शांत जागेच्या शोधात या खेड्यात आला असावा, अशी शक्यता वनाधिकाऱ्यांनी नंतर व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article